30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर… सुपरस्टार गोविंदाचा सुखी संसार मोडणार? सोशल मीडियावर घटस्फोटाच्या चर्चा

30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर… सुपरस्टार गोविंदाचा सुखी संसार मोडणार? सोशल मीडियावर घटस्फोटाच्या चर्चा

Superstar Govinda And Sunita Ahuja’s Divorce Rumours : अभिनेता गोविंदा (Superstar Govinda) आजकाल चित्रपटांमध्ये फारसा दिसत नसला तरी, त्याचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिलंय. कधी पुतण्या कृष्णासोबत चढउतार असलेलं नातं, तर कधी त्याच्या पत्नीचं त्याच्याबद्दलचे विधान. कधी त्याच्या स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने त्याच्या पायात गोळी लागल्याची बातमी. सोशल मीडियावर नेहमीच गोविंदाबद्दल (Sunita Ahuja) चर्चा सुरू असते.

ऐन उन्हाळ्यात राजकारण तापणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा राज्यव्यापी दौरा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

अलीकडेच, गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्याबद्दल एक बातमी प्रमाणात व्हायरल (Bollywood News) होतेय. 37 वर्षांच्या सुखी संसारानंतर सुनीता आणि गोविंदा एकमेकांपासून वेगळे होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. परंतु याबाबत अजून गोविंदा किंवा सुनीता यांच्या टीमकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Linc (@starlinc.live)

काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये गोविंदाची पत्नी सुनीता हिने स्वतः सांगितलं होतं की, ती आणि गोविंदा एकत्र राहत नाहीत. ती तिच्या मुलांसह एका फ्लॅटमध्ये राहते, तर गोविंदा तिच्या घराजवळील बंगल्यात राहतो. त्यांचे वेळापत्रक जुळत नसल्याने ते वेगळे राहत आहेत. घटस्फोटाच्या बातमीला या विधानाशी जोडून, ​​लोक असा अंदाज लावत आहेत की गोविंदा आणि सुनीता यांचा घटस्फोट होणार आहे.

महाकुंभातील शेवटचं स्नान, प्रयागराजमध्ये भाविकांची तुंबळ गर्दी; प्रशासनाचा मास्टर प्लॅन समोर

गोविंदा एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. गोविंदाच्या व्हॅलेंटाईनवर सुनीताची कमेंट व्हायरल झाली होती. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये, सुनीता आहुजा तिच्या मुलासोबत आकर्षक लाल ड्रेसमध्ये कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. कॅमेऱ्यांसमोर पोज देताना, पापाराझींनी गोविंदाचा ठावठिकाणा विचारला. उत्तरात सुनीता म्हणाली की, नमस्कार, हॅपी व्हॅलेंटाईन! सर त्यांच्या व्हॅलेंटाईनसोबत आहेत. गैरसमज करू नका, त्याला त्याचे काम खूप आवडते, म्हणून त्याचे काम त्याचे व्हॅलेंटाईन आहे.

घटस्फोटाच्या वृत्ताला त्यांच्याकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसला तरी, अहवाल असं सूचित करतोय की सततच्या मतभेदांमुळे आणि जीवनशैलीतील फरकांमुळे या जोडप्यामध्ये वारंवार वाद होत आहेत. सुनीताच्या अलीकडील विधानांमुळे आणि व्हायरल व्हिडिओमुळे या अटकळात आणखी भर पडली आहे. सध्या चाहते गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याबद्दल अधिकृत निवेदनाची वाट पाहत आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube