रविवारी दारूची बाटली लागतेच…अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीताने सांगितला ‘ब्रँड’

Sunita Ahuja on Drinks : अभिनेता गोविंदा केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याची पत्नी सुनीता अहुजा तिच्या स्पष्टवक्त्यासाठीही ओळखली जाते. तसंच, सुनीता जेवढी धार्मिक आहे तेवढीच तिला जगण्याचा आनंद घ्यायलाही आवडतं. (Drinks) तिला दारू खूप आवडते. तिने हे अनेक मुलाखतींमध्ये अगदी बिनधास्तपणे सांगितली आहे.
सुनीता आहुजाने एका मुलाखतीत तिच्या आवडत्या गोष्टींबद्दल सांगताना तिने सांगितले की ब्लू लेबल ही तिची आवडती दारू आहे. जेव्हा जेव्हा ती आनंदी असते तेव्हा ती दारू पिते. सुनीता म्हणाली की, काही दिवसांपूर्वी जेव्हा तिचा मुलगा यश लाँच झाला तेव्हा तिला खूप आनंद झाला की तिने एकटीने संपूर्ण बाटली संपवली. सुनीताच्या मते, जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असतो तेव्हा ती संपूर्ण बाटली संपवते. ती म्हणते की ती दररोज दारू पीत नाही. ती फक्त रविवारीच पिते.
तुर्कीला आणखी एक दणका! तुर्किश कलाकारांना बॉलीवूडचे दरवाजे बंद; शुटिंगही थांबणार
सुनीता म्हणाली की ती तिच्या वाढदिवसाला स्वतःसोबत वेळ घालवते. तिने असंही म्हटलं, की तिने तिचं संपूर्ण आयुष्य तिच्या मुलांची काळजी घेण्यात घालवलं. पण आता ते मोठे झाले आहेत म्हणून आता सुनीताला स्वतःसोबत वेळ घालवायला आवडते. सुनीता म्हणाली की, मी एकटीच बाहेर जाते. कधी देवीच्या मंदिर तर कधी गुरुद्वारामध्ये जाऊन येते. मग रात्री 8 वाजले की मी दारूची बाटली उघडते, केक कापते आणि एकटीच दारू पिते. माझा वाढदिवस साजरा करते.
त्यासोबत ती म्हणते, मी कुणाच्या घरी जाऊन आनंद साजरा करत नाही. माझं घर आहे मी आनंद साजरा करते. त्यामुळे लोक काय म्हणतील मला काही घेणदेण नसत. आपलं जीवन आपण आनंदाने जगावं असं माझं मत आहे असंही ती म्हणाली. दरम्यान, मध्ये-मध्ये सुनीता गोविंदाच्या वादाच्या किंवा एकत्र न राहण्याच्या तसंच, घटस्फोटाच्या चर्चा येतच असतात. पण त्या सर्व चर्चांना किंवा बातम्यांना सुनीताने नेहमीच टाळलं आहे. त्या सर्व अफवा असल्याचंही तिने म्हटलं आहे.