तुर्कीला आणखी एक दणका! तुर्किश कलाकारांना बॉलीवूडचे दरवाजे बंद; शुटिंगही थांबणार

तुर्कीला आणखी एक दणका! तुर्किश कलाकारांना बॉलीवूडचे दरवाजे बंद; शुटिंगही थांबणार

Boycott Turkey : भारत आणि पाकिस्तान तणावात कायमच (India Pakistan War) पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या तुर्कीला दणका देण्यास भारताने सुरुवात केली आहे. तुर्कीतून येणाऱ्या सगळ्याच वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहिम देशात सुरू झाली आहे. भारताविरोधात चुकीच्या बातम्या आणि भ्रामक माहिती पसरवण्याचे काम करणाऱ्या तुर्कीच्या टीआरटी वर्ल्ड ब्रॉडकास्टरचे ट्विटर अकाउंट भारतात बंद करण्यात आले. टूरिस्ट कंपन्यांनीही तुर्कीच्या विमान आणि हॉटेल बुकिंग बंद केले. यातच तुर्कीला आणखी एक दणका बसला आहे.

आता भारतीय फिल्म इंडस्ट्रीनेही तुर्कीला धडा शिकवण्याचा निश्चय केला आहे. भारतीय चित्रपट आणि टिव्ही शोचे तुर्कीत होणारे शुटिंगवर इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) बंदी घातली आहे. भारताकडून सध्या तुर्की विरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. आता इंडियन फिल्म इंडस्ट्रीने मोठा निर्णय घेतला आहे. असोसिएशनने तुर्कीत कोणताही भारतीय चित्रपट, टेलीविजन शोच्या चित्रीकरणावर बंदी घातली आहे.

भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका; ट्रम्प तात्यांंनी पुन्हा फिरवलं ‘कार्ड’; टॉम कुक यांना दिला सल्ला

तुर्कीत भारतीय चित्रपटांची शुटिंग बंद

तु्र्की भारताचा शत्रू पाकिस्तानला मदत करत आहे म्हटल्यानंतर त्याला कठोर उत्तर देणे गरजेचे आहे. देशात प्रत्येक बाजून तु्र्कीचा बहिष्कार सुरू झाला आहे. भारतीय चित्रपट आणि टिव्ही कार्यक्रमांच्या चित्रीकरणासह AICWA ने तुर्कीतील कलाकार आणि प्रोडक्शन हाउस बरोबर काम करण्यावरही बंदी घातली आहे. इतकेच नाही तर कोणत्याही डिजिटल कंटेंटचे चित्रीकरण तुर्कीत होणार नाही.

AICWA ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही नेहमीच देशासोबत आहोत. तुर्कीचे पाकिस्तानसोबत उघड संबंध विशेष करुन दहशतवाद आणि अस्थिरतेच्या प्रसंगात आहेत. याकडे कदापि दुर्लक्ष करता येणार नाही. भारतीय फिल्म इंडस्ट्री अशा कोणत्याही देशाला पाठिंबा किंवा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाही.

TRT वर्ल्डचे एक्स अकाउंट बंद

टीआरटी वर्ल्ड भारताविरुद्ध सातत्याने चुकीच्या बातम्या आणि भ्रामक माहिती पसरवण्याचे काम करत होते. तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यर एर्दोगन यांनी तर पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला होता. यानंतर भारताने तुर्कीलाही त्याची जागा दाखवून दिली आहे. तुर्कीच्या लीडिंग ब्रॉडकास्टरचे भारतातील एक्स अकाउंट बंद केले आहे.  भारतात आजघडीला तुर्कीच्या बॉयकॉटची मोहिम जोरात सुरू आहे. भारतीय नागरिकांनी तुर्की आणि अजरबैजानच्या यात्रांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. अनेक टुरिस्ट कंपन्यांनी देशहिताला प्राधान्य देत तुर्की आणि अजरबैजानचे विमान, हॉटेल्स बुकिंग रद्द केले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube