Kishtwar : किश्तवाड ढगफुटीत मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू, 200 बेपत्ता

Kishtwar Cloudburst Updates : जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) किश्तवाड येथे काल ढगफुटी ( Kishtwar Cloudburst) झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे एकच हाहाकार उडाला. चसौती या गावात ही ढगफुटीची घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा सातत्याने वाढत चालला आहे. नुकचत्याच हाती आलेल्या Kiया लोकांच्या शोधासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम केले जात आहे.
किश्तवाडमध्ये गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक ढगफुटी झाली. यात सीआयएसएफच्या दोन जवानांसह 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा जास्त लोक बेपत्ता झाले आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
किश्तवाड येथील जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. तर काही जण पड्डार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. मचैल माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चशोती गावात ही घटना घडली. यावेळी मंदिरात मोठी गर्दी झाली होती. 9500 फूट उंचावर असणाऱ्या या मंदिरात जाण्यासाठी चशोती गावापर्यंतच वाहनांची व्यवस्था आहे. यानंतर जवळपास साडेआठ किलोमीटरचे अंतर पायी चालूनच पार करावे लागते. अधिकाऱ्यांनी सांगितले की मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 100 लोकांना वाचवण्यात आले आहे. तसेच 200 लोक अजूनही बेपत्ता आहेत.
मोठी बातमी ! जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, 10 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. किश्तवाडमधील ढगफुटीच्या घटनेने मी दुःखी आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो, असं त्यांनी म्हटलं. तसेच जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना सिन्हा यांनी केली आहे. त्यांनी सिव्हील, पोलिस, सैन्य, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्याला मदत करण्याचे आणि पीडितांना शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिलेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले. पीडित लोकांच्या सोबत आहोत. लोकांना तत्काळ मदत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. येथील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. मदतकार्य सातत्याने सुरू आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.