अबब! जग एका दिवसाला पितं ‘इतके’कप चहा; जाणून घ्या चकित करणारा आकडा

The world drinks ‘so many’ cups of tea in a day; Know the shocking number: जगभरामध्ये आज जागतिक चहा दिन साजरा केला गेला. कारण जगात चहा न आवडणारे लेक अत्यंत कमी प्रमाणात आहेत. शक्यतो लोकांची सकाळची सुरूवातच चहा पिण्याने होते. अनेकजण तर दिवसभरामध्ये 3 ते 4 वेळा चहा पितात. चहा हे एक व्यसन बनलं आहे. पाश्चात संस्कृतीतून आला असला तरी देखील चहा हा भारतीय लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. पाहुणचारापासून ते चर्चा अन् सुख-दु:ख शेअर करण्यापर्यंत सर्वत्र एकच पेय साथीला असतं ते म्हणजे चहा. त्यामुळे जाणून घेऊ एका दिवसांत जगभरात लेक किती कप चहा पितात?
एका दिवसात किती प्रमाणात गोड पदार्थ खावेत? शरीराला किती साखरेची गरज? जाणून घ्या…
चहा हे जगात सर्वात जास्त पिलं जाणारं पेय आहे. त्यामुळे यावर आलेल्या एक रिपोर्टनुसार जगभरात लोक एका दिवसांत जवळपास 3 अरब कप म्हणजे 300 कोटी कप चहा पितात. ज्यामध्ये ग्रीन टी, लेमन टी, आल्याचा चहा त्याचबरोबर इतक अनेक प्रकारचे चहा पिले जातात. त्यामुळे दरवर्षी 21 मे ला जागतिक चहा दिन साजरा केला जातो. हा दिवस चहाचा इतिहास, सांस्कृतिक महत्त्व आणि अर्थिक प्रभाव तसेच या दिवसाचा हेतू चहाच्या शेतीमागील हेतू, गरज आणि वापरामुळे आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.
‘अंगावर जखमा…’, वैष्णवी हगवणेंच्या पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर
तसेच या रिपोर्टनुसार 2020 मध्ये जागतिक चहाची खप ही 6.3 बिलियन किलोहून अधिक झाली. ज्यामध्ये जागतिक चहा उद्योगाची किंनत जवळपास 2020 मध्ये 207.1 बिलियन अमेरिकन डॉलर होती आणि 2025 पर्यंत ही किंमत 266.7 अरब डॉलरपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. तसेच चहा हे अक असं पेय आहे. जे लोकांना आपआपसांत जोडतं असं म्हटलं जात. जगभराचील अनेक लोकांची सुरूवात ही चहा पिऊन होते. मात्र त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. ज्यामध्ये हार्टवर वाईट परिणाम होतं असेलं. कारण चहामध्ये कॅफिन असतं. जे जास्त प्रमाणात सेवन केल्याने निद्रानाश चिंता आणि ह्रदयाचे ठोके वाढू शकतात.
11 वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरु पण पहिल्या दिवशी वेबसाईट ठप्प, विद्यार्थांचा उडाला गोंधळ
त्याचबरोबर जास्त चहा पिल्याने अॅसिडीटी, गॅस आणि पचन संबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर चहामध्ये टॅनिन असतं. जे दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतं. कारण त्यामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होतं. त्याचा थेट परिणाम दातांच्या आरोग्यावर होतो. तसेच त्यामुळे हाडं ठिसूळ होऊ शकतात. काही लोकांना अॅलर्जी आणि सेन्सिसीटीव्ही त्यामुळे दिवसभरात 1 ते 2 वेळा चहा पिणे आरोग्यास एकवेळ ठिक आहे. पण त्यापेक्षा जास्त चहा पिल्याने आरोग्यास हानिकारक ठरू शकतो. असं तज्ज्ञ सांगतात.