‘आदि अनंत’मधून उलगडणार ‘आजोबा -नातवाच्या गोड नात्याचे भावविश्व

Aadi Anant या आगामी मराठी चित्रपटाच्या टीझरमधून प्रेक्षकांना एका भावस्पर्शी कौटुंबिक गोष्टीची झलक अनुभवायला मिळणार आहे.

Aadi Anant

‘Aadi Anant’ to Unfold Emotional World of Sweet Bond Between Grandfather and Grandson : काही नाती शब्दांपलीकडची असतात… ज्यात प्रेम असतं, काळजी असते आणि न बोलताही व्यक्त होणारा भावनिक आधार असतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आणि नव्या पिढीतील सदस्य यांच्यातील नातंही असंच खास असतं. अनुभवातून मिळणारे संस्कार, मायेने केलेले लाड आणि आयुष्यभर मनात जपून ठेवाव्यात अशा आठवणी या नात्याला अधिक समृद्ध करतात. याच भावविश्वाची हळवी अनुभूती देणाऱ्या ‘आदि अनंत’ या आगामी मराठी चित्रपटाच्या टीझरमधून प्रेक्षकांना एका भावस्पर्शी कौटुंबिक गोष्टीची झलक अनुभवायला मिळणार आहे.

सुशिक्षित बेरोजगाराची धमाल गोष्ट उलगडणार! अंकुर वाढवेला लागली ‘कोलंबस”ची लॉटरी!

घरातील ज्येष्ठ व्यक्ती अर्थात आजोबा म्हणजे केवळ मार्गदर्शक नव्हे, तर कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा प्रेमाचा धागा असतो. त्यांच्या सहवासातून मिळणारी शिकवण, छोट्या छोट्या गोष्टींतून व्यक्त होणारी माया आणि प्रत्येक प्रसंगी पाठीशी उभं राहाण्याची भावना नात्यांना वेगळीच उब देतात. ‘आदि अनंत’मधून अशाच जिव्हाळ्याच्या नात्याचं भावविश्व उलगडणार आहे. या चित्रपटातील कथा प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाशी, बालपणीच्या आठवणींशी आणि आपुलकीच्या माणसांशी पुन्हा एकदा जोडणारी ठरणार आहे.

महागाईने खिसा रिकामा, नोकरीवरही संकट! महागाईला लगाम का लागत नाही? नोबेलविजेत्यांनी उलगडलं गणित

दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, “आजोबा आणि नातू यांच्यातील नातं हे प्रेम, विश्वास आणि निरपेक्ष मायेने विणलेलं असतं. या नात्यात निरागस हट्ट असतात, छोट्या-मोठ्या कुरबुरी असतात, तर कधी आयुष्यभर पुरेल असा भावनिक आधारही असतो. ‘आदि अनंत’मधून हे नातं सहज, सुंदर आणि भावनिक रूपात मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. या चित्रपटातील प्रसंग पाहाताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू यावं, मनात जुन्या आठवणी जाग्या व्हाव्यात आणि आपल्या माणसांचं महत्त्व पुन्हा एकदा जाणवावं, अशी माझी इच्छा आहे.”

ब्रिटिश सत्तेला हादरावणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांचा धगधगता इतिहास; ‘पत्री सरकार 1942’ चे दमदार पोस्टर प्रदर्शित!

निर्माते समीर हंपी आणि अनिकेत मराठे सांगतात, “‘आदि अनंत’ ही प्रत्येक कुटुंबाला आपलीशी वाटेल अशी गोष्ट आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेलं प्रेम, त्यांच्याकडून मिळणारा आधार आणि कुटुंबासोबत घालवलेले क्षण आपल्या मनात कायम घर करून राहतात. या चित्रपटातून अशाच भावनांना उजाळा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भावनिक क्षणांसोबतच मनोरंजनाची सुंदर सांगड घालत हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून अनुभवता येईल, अशी आमची अपेक्षा आहे. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना या चित्रपटात स्वतःच्या नात्यांचं प्रतिबिंब दिसेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

अजय देवगणच्या ‘दृश्यम द कन्क्लूजन’वर मोहनलाल फिदा; संपूर्ण टीमसाठी दिला खास संदेश!

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे निर्मित, रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश लिमये यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर हे कलाकारही दिसणार आहेत. येत्या १२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दमदार कलाकारांची फौज उलगडवणार रहस्याच्या सावलीत ‘खग्रास’ची गोष्ट! चित्रपटाचे टायटल पोस्टर प्रदर्शित

नात्यांमधील प्रेम, आपुलकी, संस्कार आणि एकमेकांसाठी उभं राहाण्याची भावना यांचा सुंदर अनुभव देणारा ‘आदि अनंत’ हा भावनिक कथा सांगतानाच संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा कौटुंबिक मनोरंजनपट ठरणार आहे. हसवणारे, भावूक करणारे आणि आपल्या माणसांचं महत्त्व पुन्हा एकदा जाणवून देणारे हे भावविश्व प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल.

follow us