‘अंगावर जखमा…’, वैष्णवी हगवणेंच्या पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर

‘अंगावर जखमा…’, वैष्णवी हगवणेंच्या पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Vaishnavi Hagawane Suicide Case : अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हिने गळफास घेऊन जीवन संपवल्यानं खळबळ उडाली. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच तिचा शवविच्छेदन अहवाल समोर आला. या अहवालातून काही धक्कादायक माहिती उघड झाली. गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्या वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! औषधी अन् सुगंधी वनस्पतींची लागवड करा बिनधास्त; ‘या’ ठिकाणी करा अर्ज 

शुक्रवारी वैष्णवी हगवणे हिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर वैष्णवीच्या माहेरच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच वैष्णवीचे वडील आनंद उर्फ ​​अनिल साहेबराव कस्पटे यांनी सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वैष्णवीच्या वडिलांनी त्यांच्या तक्रारीत असाही आरोप केलाय की, वैष्णवीचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवीला क्रूर वागणूक दिली.

पाऊस आज पुन्हा पुणेकरांची दाणादाण उडवणार; वाचा कोसळणाऱ्या सरींचा नेमका अंदाज काय? 

अंगावर जखमा त्यामुळे मृत्यू…
दरम्यान, वैष्णवी हगवणेच्या शवविच्छेदन अहवालातून गंभीर माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला असू शकतो, अशी शक्यता आहे, असंही सूत्रांनी म्हटलं. त्यामुळं या शवविच्छेदन अहवालामुळं आता या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं. वैष्णवीने आत्महत्या केली का? की, तिच्यासोबत काही घातपात घडला? असे अनेक प्रश्न या अहवालामुळे निर्माण झालेत.

दरम्यान, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाने पोलिसांना निष्पक्ष आणि जलद तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात जर आरोपी दोषी आढळला तर त्याला तात्काळ अटक करावी, असेही आयोगाने निर्देश दिलेत. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना तीन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube