फक्त वैष्णवीच नाही…मोठ्या सुनेचा देखील हगवणे कुटुंबाने केला छळ, कपडे फाटेपर्यंत अमानुष मारहाण

Rajendra Hagwane’s elder daughter in law also harassed by family : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मुळशीतील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हागवणे हिने (Vaishnavi Hagawane Case) आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर तिचा पती आणि राजेंद्र हगवणे दोघेही फरार आहे. वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केला, असा आरोप सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर (Pune Crime) आहे. या घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. लहान सुनेचा जसा छळ केला तसा मोठ्या सुनेचा देखील हगवणे कुटुंबाने (Rajendra Hagwane) छळ केल्याचं समोर आलंय.
हगवणेंच्या मोठ्या सुनेने नोव्हेंबर 2024 मध्ये पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, याबाबत गुन्हा देखील दाखल केला आहे. सासरे राजेंद्र यांनी वैष्णवीला कपडे फाटेपर्यंत मारहाण करत मनास लज्जा निर्माण होईल असं कृत्य (Pune News( केलं. परंतु तेव्हा राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचं समोर आलंय. जर कदाचित त्याचवेळी कठोर कारवाई झाली असती तर आज लहान सून वैष्णवीवर असं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली नसती.
मराठी रंगभूमीवर नवा विक्रम; अमेरिकेतही ‘वाडा चिरेबंदी’चा डंका!
सुनेचा छळ
लहान सुनेच्या आत्महत्येनंतर अजित पवारांचे पदाधिकारी असलेले सासरे राजेंद्र पोलिसांच्या हाती लागत नाहीयेत, त्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आता वैष्णवी
शशांक हगवणे (24) हिने आत्महत्या केली की, तिची हत्या करून आत्महत्येचा बनाव करण्यात आला, याचा छडा लावणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे. दरम्यान, ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून, वैष्णवीच्या माहेरच्या वाकड येथील कस्पटे कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.
मोदी जॅकेटनंतर आता मोदीहार समोर; अभिनेत्री रुची गुर्जरने गळ्यात घातला पंतप्रधान मोदींचा फोटो नेकलेस
डॉक्टरांचा अहवाल काय सांगतो?
डॉ. जयदेव ठाकरे आणि डॉ. एच.एस. ताटिया यांनी स्वाक्षरीत सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा सुद्धा आढळून आल्या आहेत. तसेच, अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून, विषप्रयोगाची शक्यताही तपासली जात आहे. पोलिसांना तपासाचे स्पष्ट निर्देश शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी, हत्या करून गळफास दिला असण्याची शक्यता व्यक्त केली असून, ती गांभीर्याने तपासावी, असे स्पष्ट निर्देश तपास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांशी शवविच्छेदनातील निष्कर्षांची सांगड घालून तपास पुढे नेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
हत्या असल्याचा संशय
प्राथमिकदृष्ट्या ही घटना आत्महत्येसारखी वाटत असली, तरीही शरीरावरील मारहाणीच्या खुणा आणि गळ्याभोवताली असलेल्या स्पष्ट खुणा पाहता, ही हत्या असल्याचा संशय नातेवाईकांना आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास खुनाच्या अनुषंगाने सुरू केला आहे.