आता मिसिंग लिंकवरील प्रवासासाठी नवीन नियम; वाहनांना वेग मर्यादा किती ?
Missing Link-सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवरून जाण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे.
Missing Link : मुंबई–पुणे यशवंतरवा चव्हाण द्रुतगती महामार्गावरील (Pune Mumbai Expressway) मिसिंग लिंक (Missing Link) मार्गावर सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नवीन वाहतूक नियम लागू करण्यात आलेत. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी अधिसूचना जारी केलीय. नवीन नियम येत्या 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहेत.
भिवंडीत FDA ची ब्लिंकिटवर कारवाई; खराब अन्नसाठ्याप्रकरणी परवाना निलंबित, गुन्हा दाखल
कोणत्या वाहनांना प्रवेशाची परवानगी ?
खासगी कार, जीप व इतर बिगर-वाहतूक हलकी मोटार वाहने (Non-Transport LMVs) यांना मिसिंग लिंकवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर प्रवासी बस व इतर प्रवासी वाहनांनाही या मार्गाचा वापर करता येईल.
कोणत्या वाहनांना प्रवेशबंदी आहे?
सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवरून जाण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. यामध्ये पिकअप व्हॅन, टाटा एस (Tata Ace) यांसारख्या हलक्या मालवाहू वाहनांचाही समावेश आहे. ज्वलनशील, स्फोटक किंवा इतर धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना (Hazardous Material Vehicles) या मार्गावरून जाण्यास सक्त मनाई आहे. बंदी असलेल्या वाहनांनी मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गाच्या जुन्या/मूळ मार्गिकेचा वापर करावा.
500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात SIT स्थापन; तीन अधिकाऱ्यांची नावे जाहीर
मिसिंग लिंकवरील निर्धारित वेगमर्यादा
खासगी कार व इतर हलकी मोटार वाहनांसाठी (LMVs) वेगमर्यादा तासी 100 किमी ठेवण्यात आली आहे. प्रवासी बस आणि प्रवासी वाहने तासी 80 किमी. वाहनचालकांनी निर्धारित वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे आणि बोगद्यांमध्ये वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
वाहनचालकांसाठी महत्त्वाच्या सूचना
प्रवासापूर्वी आपल्या वाहनाचा प्रकार मिसिंग लिंकवर प्रवेशासाठी अनुमत आहे की नाही, याची खात्री करावी. मालवाहू व अवजड वाहनचालकांनी मिसिंग लिंककडे जाण्याचा प्रयत्न न करता जुन्या द्रुतगती महामार्गाचा वापर करावा. धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी या मार्गाचा वापर करू नये.निर्धारित वेगमर्यादा पाळावी आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.
ही अधिसूचना 1 नोव्हेंबर 2026 पासून पुढील आदेश होईपर्यंत कायमस्वरूपी लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी या नियमांची नोंद घेऊन त्यांचे पालन करावे, असे आवाहन
महामार्ग पोलीस- पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिवाजी पवार यांनी केले आहे.