महाकुंभातील शेवटचं स्नान, प्रयागराजमध्ये भाविकांची तुंबळ गर्दी; प्रशासनाचा मास्टर प्लॅन समोर

महाकुंभातील शेवटचं स्नान, प्रयागराजमध्ये भाविकांची तुंबळ गर्दी; प्रशासनाचा मास्टर प्लॅन समोर

Uttar Pradesh Mahakumbh 26 February Plan : प्रयागराज (Prayagraj) येथील महाकुंभाचा (Mahakumbh) समारोप उद्या होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणाऱ्या महाकुंभाच्या शेवटच्या स्नान महोत्सवादरम्यान गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. 25 फेब्रुवारीपासून मेळा परिसरात आणि शहरात वाहनमुक्त क्षेत्र लागू करण्यात आलंय. तसंच, संपूर्ण शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात (Uttar Pradesh) आलाय. महाकुंभाच्या शेवटच्या स्नान महोत्सवात 3 कोटींहून अधिक भाविक संगमाला भेट देतील, असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.

ऐन उन्हाळ्यात राजकारण तापणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा राज्यव्यापी दौरा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 4 वाजल्यापासून मेळा परिसर वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. तर प्रयागराज आयुक्तालय सायंकाळी 6 वाजल्यापासून वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित केले (Plan For Mahakumbh) जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही व्यवस्था राखण्यासाठी सर्वांना मदत करण्याची विनंती करण्यात आलीय. गर्दीचे व्यवस्थापन सुरळीत राहावे यासाठी, सर्वांना प्रवेशद्वाराजवळील घाटावरच स्नान करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

भाविकांच्या स्नानासाठी प्रशासनाचा मास्टर प्लॅन
महाकुंभ प्रशासनाने चारही दिशांनी येणाऱ्या भाविकांच्या संख्येनुसार स्नान योजना तयार केलीय. दक्षिण झुसीहून येणारे भाविक संगम द्वार ऐरावत घाटावर स्नान करू शकतील. उत्तर झुसीहून येणारे भाविक संगम हरिश्चंद्र घाट आणि संगम जुना जीटी घाट येथे स्नान करतील. तसेच, परेडमधून येणारे भाविक संगम द्वार भारद्वाज घाटावर स्नान करू शकतील. संगम गेटवरून येणारे नागवासुकी घाट, संगम गेट मोरी घाट, संगम गेट काली घाट, संगम गेट राम घाट, संगम गेट हनुमान घाट येथे स्नान करतील. अरैलहून येणारे भाविक संगम द्वार अरैल घाटावर स्नान करतील.

मोठी बातमी : १९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेप

अत्यावश्यक सेवांसाठी सूट
औषधे, दूध, भाज्या, रुग्णवाहिका आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या (डॉक्टर, पोलिस, प्रशासन) वाहनांवर कोणतेही बंधन राहणार नाही. महाकुंभ महोत्सवाचा समारोप 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर होणार आहे. भाविकांना जवळच्या घाटावर लवकर स्नान करण्याची, शिव मंदिरात दर्शन घेण्याची आणि नंतर त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जाण्याची विनंती करण्यात आली आहे.

भाविकांना आवाहन करण्यात आलंय की, सर्व घाट संगमासारखे आहेत. म्हणून भाविकांनी जवळच्या घाटावर स्नान करावे आणि वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनात सहकार्य करावे. महाकुंभ 2025 दरम्यान भाविकांची प्रचंड गर्दी आणि कामकाजाच्या कारणांमुळे, भारतीय रेल्वेने काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांची सुरक्षितता आणि गर्दी व्यवस्थापन लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube