Uttar Pradesh Loksabha Election Result : भाजपला धक्काच! उत्तर प्रदेशात ‘सायकल’ सुसाट पळाली…

Uttar Pradesh Loksabha Election Result : भाजपला धक्काच! उत्तर प्रदेशात ‘सायकल’ सुसाट पळाली…

Uttar Pradesh Loksabha : देशभरात 18 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result) जाहीर होत आहे. देशातल्या अनेक राज्यांत भाजपला मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे. एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) चुरशीची लढत सुरु असल्याचं चित्र असतानाच आता उत्तर प्रदेशातही भाजपला धक्का बसल्याचं दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात भाजप 32 जागा मिळाल्या असून समाजवादी पार्टीची सायकल सुसाट पळत असल्याचं दिसतंय. समाजवादी पार्टीला 37 तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्याची आकडेवारी समोर आलीयं. यासोबतच आरएलडीला 2 तर एएसपीकेआरला 1 जागांवर आघाडी मिळालीयं.

Kolhapur Loksabha : कोल्हापुरकरांचं छत्रपतींच्या गादीलाच मत! शाहु महाराज एक लाखांच्या लीडने दिल्लीत…

अमेठी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणी 50 हजार 758 मतांनी मागे असून काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल 1 लाख 69 हजार 827 मतांनी आघाडीवर आहेत. तर लखीमपुर मतदारसंघात समाजवादी मतदारसंघाचे उत्कर्ष वर्मा 2 लाख 71 हजार 638 मतांनी आघाडीवर असून भाजपचे अजय कुमार 3 हजार 175 मतांनी पिछाडीवर आहेत. मैनपुरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे जयवीर सिंह 92700 मतांनी पिछाडीवर आहेत, तर समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव 292330 मतांनी आघाडीवर आहेत.

Elections Results : विदर्भाचा कौल! चंद्रपूर, अमरावती, अकोल्यात कोणाची आघाडी?

उत्तर प्रदेशात मागील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याचं चित्र होतं. 2014 आणि 2019 साली भाजपने सत्ता मिळवली होती. या निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला होता. मात्र, भाजपचा हा नारा फेल ठरल्याची परिस्थिती दिसून येत आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपच मुसंडी मारत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र एक्झिट पोल फेल ठरलेत. एनडीए सत्तेत जात असली तरीही इंडिया आघाडीलाही चांगल्याच मिळाल्या असल्याने मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, यंदाची निवडणूक भाजपला चांगलीच जड गेली असून निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप आणि काँग्रेसमध्ये घमासान सुरु आहे. एनडीए सध्या 296 जागांवर तर इंडिया आघाडी 229 जागांवर आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज