श्रद्धा जीवावर बेतली! भोंदूबाबाकडून पत्नी अन् मुलीवरून ब्लॅकमेलिंग; पतीने केली आत्महत्या

श्रद्धा जीवावर बेतली! भोंदूबाबाकडून पत्नी अन् मुलीवरून ब्लॅकमेलिंग; पतीने केली आत्महत्या

Blackmailing of wife and daughter by Bhondubaba Husband suicide : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाळसा वडाळा गावातील ज्ञानेश्वर भिका आहेर या 30 वर्षीय विवाहित व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दहा दिवसापूर्वी घडली होती.या घटनेनंतर आत्महत्या करणाऱ्या आहेर यांच्या पत्नी अंजना ज्ञानेश्वर आहेर यांनी भोकरदन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करत एका भोंदू बाबाच्या त्रासाला कंटाळून आपल्या पतीने आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हंटल होत.

AI थेट रस्त्यावर! पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोठा तोडगा, विधानसभेत महत्वाचा निर्णय

या फिर्यादी वरून भोकरदन पोलिसांनी भोंदू बाबाला आत्महत्यास प्रवृत्त बुलढाणा जिल्ह्यातील मोजे गुम्मी गावातून ताब्यात घेऊन अटक करत या प्रकरणी अधिक चौकशी केली असता.या प्रकरणात ज्ञानेश्वर भिका आहेर आपली पत्नी अंजना ज्ञानेश्वर आहेर व मुलीसोबत बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव (धाड) या ठिकाणी दर्शनासाठी गेले असताना आरोपी भोंदू बाबा याच्याशी त्याची ओळख झालीया ओळखीतून भोंदू बाबा यांनी मोबाईल नंबर आणि गावाचा पत्ता घेत अंजना ज्ञानेश्वर आहेर हिच्यावर वाईट नजर टाकून फोन करून आणि चिट्ठीपाठवून त्रास देण्यास सुरुवात केली.

औरंगजेबावर स्तुतीसुमनं उधळणाऱ्या अबू आझमींना दिलासा; 20 हजारांच्या बॉंडवर अटकेपासून संरक्षण

वारंवार ज्ञानेश्वर याला फोन करून आणि चिठ्या पाठवून तुझी मुलगी ईश्वरी ही माझीच आहे.ईश्वरी मला पाहीजे नाहीतर मी तुमच्यावर 05 से 10 लाखाचा मानहानीचा दावा दाखल करेल अस म्हणत सतत त्रास दिला या त्रासाला आणि बदनामी होईल या भीतीने ज्ञानेश्वर यांनी आत्महत्या केल्याचं उघड झाल्या नंतर पोलिसांनी या प्रकरणी आणखी तपास केला असता.

PM मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान… हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय

आरोपी भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे याला गुप्त धनासाठी नरबळी देण्यासाठी पायाळू मुलगी हवी होती. त्यासाठी त्यानं ईश्वरी हिची मागणी केली होती. पती पत्नीनी नकार दिल्याने या बाबाने एका वकीला मार्फत पती पत्नीला सहा लाखाची नोटीस ही बजावली होती. या भोंदू बाबाने नरबळीसाठी खडा ही करून ठेवल्याची धक्कादायक बाब पोलिस चौकशीत समोर आलीय. त्यामुळे तो या पती पत्नीला ब्लैकमेलिंग करत होता.

त्यातूनच घाबरलेल्या ज्ञानेश्वरने आत्महत्या केल्याचं ही तपासात उघड झाल्याने भोकरदन पोलिसांनी नरबळी देण्यासाठी मुलीची मागणी करून आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केलीय.या प्रकरणी बाबा सोबत आणखी कोण होत का.? याचा ही तपास पोलिसांडून केल्या जात आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खबल उडाली असून भोकरदन पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube