PM मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान… हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय

PM मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान… हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय

Mauritius Highest Civilian Honor To PM Modi : मॉरिशसचे (Mauritius) पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ प्रदान करण्याची घोषणा (Mauritius Highest Civilian Honor) केली. मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय बनले आहेत. पोर्ट लुईस येथील भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात रामगुलाम यांनी ही घोषणा केली.

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांचे स्वागत रामगुलाम यांनी (Award To PM Modi) केलंय. विमानतळावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे उबदार आलिंगन देऊन स्वागत केलंय. बुधवारी मॉरिशसच्या 57 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात पंतप्रधान प्रमुख पाहुणे असणार आहेत. या समारंभात भारतीय नौदलाच्या युद्धनौकेसह भारतीय संरक्षण दलांचा एक तुकडा सहभागी होणार आहे.

विधान परिषदेसाठी माधव भंडारींसह भाजपची तीन नावं दिल्लीत; शिंदे-अजित पवारांना एक-एक जागा

यावेळी पंतप्रधान मोदी भारताने निधी दिलेल्या 20 हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन देखील करणार आहेत. याशिवाय ते राष्ट्रात लोकशाही मजबूत करण्याच्या उद्देशाने नवीन प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा देखील करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी मॉरिशसचे अध्यक्ष धरमबीर गोखूल यांची भेट घेतली. या काळात त्यांनी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना अनेक गोष्टी भेट म्हणून दिल्या आहेत, यामध्ये महाकुंभातील संगमचे पाणी आणि सुपर फूड मखाना यांचा समावेश आहे. याशिवाय, पंतप्रधानांनी गोखूल यांच्या पत्नी वृंदा गोखूल यांना बनारसी सिल्क साडी भेट दिली.

मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर लिहिलंय की, ‘राष्ट्रपती धरमबीर गोकूल यांच्याशी खूप चांगली भेट झाली. ते भारतीय संस्कृतीशी चांगला परिचित आहेत. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त केलीय. आम्ही विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांना आणखी चालना देण्याच्या मार्गांवर चर्चा केली, असं देखील मोदींनी म्हटलं आहे.

विराट कोहली एकाच धावेवर बाद, 14 वर्षीला मुलीला धक्का बसला… हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, मॉरिशसच्या स्टेट हाऊसमध्ये आयुर्वेदिक बाग बांधण्यात आलीय, हे कौतुकास्पद आहे. मॉरिशसमध्ये आयुर्वेदाची लोकप्रियता वाढत आहे, याचा मला आनंद आहे. अध्यक्ष धरमबीर गोखूल आणि मी आयुर्वेदिक उद्यानाला भेट दिली. मला ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. पंतप्रधान मोदी 10 वर्षांनी मॉरिशस दौऱ्यावर आहेत. यापूर्वी, पंतप्रधान मोदी मार्च 2015 मध्ये मॉरिशसला भेट दिली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मॉरिशस आणि भारताचे जुने संबंध आहेत. येथील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 70 टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube