PM Modi यांच्या शपथविधीला पोहचले अन् खासदारही नसलेल्या या नेत्याला लागली थेट मंत्रिपदाची लॉटरी

PM Modi यांच्या शपथविधीला पोहचले अन् खासदारही नसलेल्या या नेत्याला लागली थेट मंत्रिपदाची लॉटरी

George Kurian make minister in PM Modi cabinet : एनडीएचे नेते नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) रविवारी (9 जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामध्ये अनेक नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यात जॉर्ज कुरीअन (George Kurian ) हे एक नेते असे होते. जे लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांना थेट मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. विशेष म्हणजे ते मोदींच्या शपथविधी सोहळ्याला पाहुणे म्हणून आले होते. त्याचवेळी त्यांना अचानक मंत्रिपद मिळालं आहे.

अतिआत्मविश्वास नडला; आरएसएसच्या मुखपत्रातून भाजप नेतृत्वावर आगपाखड !

पंतप्रधान मोदींच्या या मंत्रिमंडळामध्ये एकाही मुस्लिम मंत्र्याचा समावेश नसला तरी देखील अल्पसंख्यांक समुदायातील पाच मंत्र्यांचा समावेश आहे. यामधीलच एक मंत्री म्हणजे जॉर्ज कुरियन त्यांना अल्पसंख्यांक कल्याण राज्यमंत्री करण्यात आलं आहे. ते केरळचे असून ख्रिश्चन समाजाचे आहेत. त्यांना मंत्रिपद देण्यामागे भाजपचा केरळमध्ये ख्रिश्चन समाजाला आकर्षित करण्याचा हेतू असल्याचा सांगितले जात आहे.

सरपंच ते मुख्यमंत्री, जाणून घ्या ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री मोहन माझी यांचा राजकीय प्रवास

कारण भाजपला मुख्यत्वे करून हिंदू समाजाचा पाठिंबा मिळतो. तर मुस्लिम समाज हा काँग्रेसला पाठिंबा देणारा मानला जातो. तर ख्रिश्चन हे डाव्यांना पाठिंबा देतात. त्यामुळे जॉर्ज कोरियन यांना देण्यात आलेल्या मंत्रीपदावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्वतः कुरियन यांनी देखील याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहे.

तसेच यावर बोलताना कुरियन म्हणाले की, ते पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला निमंत्रित म्हणून गेले होते. मात्र तिथे गेल्यानंतर जेव्हा त्यांना कळालं की, त्यांना मंत्रिपद दिलं जाणार आहे. त्याबद्दल त्यांना कल्पना नव्हती. कुरियन यांच्या बद्दल सांगायचं झालं तर ते आरएसएसच्या विद्यार्थी संघटनेचे म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय नेते होते. त्यामुळे त्यांना हे मंत्रिपद देण्यात आलं. तर मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना कुरियन यांनी सांगितले की, आपण अल्पसंख्यांक समाजासाठी काम करू.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज