PM Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियूष गोयलसह ‘या’ खासदारांनी घेतली शपथ
PM Modi Cabinet : आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (PM Modi Oath) यांनी शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह महाराष्ट्रातील 6 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपचे नितीन गडकरी (Nitin Gadkari), पियूष गोयल (Piyush Goyal) , रक्षा खडसे (Raksha Khadse) , मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) या नेत्यांचा समावेश आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आणि आरपीआयचे रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीन गडकरी आणि पियूष गोयल यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे तर उर्वरित नेत्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
मुरलीधर मोहोळ पुणेमधून पहिल्यांदा खासदार झाले आहे तर रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले असून नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडून आले आहे तर पियूष गोयल मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाचे प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे असून रामदास आठवले आरपीआयचे राज्यसभा खासदार आहे.
तर दुसरीकडे अजित पवार यांच्या गटातील प्रफुल पटेल यांना देखील मंत्रिपद मिळणार होते मात्र त्यांना काही काळ धीर धरण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, भाजपकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता, मी पूर्वी भारत सरकारमध्ये मंत्री होतो. त्यामुळे स्वतंत्र प्रभार पदभार घेणं मला योग्य वाटत नव्हतं. त्याच्यात भाजपच्या काही श्रेष्ठींची चकू आहे किंवा नाही, असं नाही. महाराष्ट्रातून शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले आहेत. त्या पध्तीने त्यांना ज्या सूचना मिळाल्या, त्याच पद्धतीने आम्हालाही सूचना मिळाल्या आहेत. तुम्ही थोडे दिवस धीर ठेवा, हेही आम्हाला सांगण्यात आलं. मी एवढेच म्हणेन की, त्यांनी महाराष्ट्रात जो काही निर्णय घेतला असेल, तो शिवसेनेशी तुल्यबळ समजूनच आमच्याबाबत निर्णय घेतला असावा, असं पटेल म्हणाले.
स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी, कराड अन् राणे.. जुन्या कॅबिनेटमधील 20 दिग्गजांना डच्चू
लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागा मिळाल्याने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली होती. यानंतर आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी एनडीएचे सर्व घटक पक्षातील नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240, काँग्रेसला 99, समाजवादी पक्षाला 36, टीडीपीला 15, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूला 12, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 07 जागांवर विजय मिळाला आहे.