Video : पुण्यात भाजपचं 125 मिशन कसं फत्ते करणार?, शहराध्यक्ष घाटेंनी सांगितलं गणित

पुण्यात भाजप आणि शिवसेना रिपाई ही युती कुणामुळं तुटली आणि 125 जागांंवर कसा विजय मिळवणार यावर भाष्य केलय शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी.

News Photo   2026 01 02T181632.249

भारतीय जनता पक्षात उमेदवारी मागणं गुन्हेगारी ठरू शकते का? या प्रश्नावर पुणे (Pune) शहर भाजपचे अध्यक्ष धिरज घाटे बोलताना म्हणाले की, असं काही नाही. पक्षाकडं उमेदवारी मागणं हा गुन्हा ठरू शकत नाही. मी तीनवेळा पक्षाकडं उमेदवारी मागितली आहे. न मिळाल्याने थोडासा नाराज झालो, पण दुसऱ्याच दिवशी मी कामाला लागलो. कारण थोड्या वेळाचा नाही तर दिर्घ काळाचा आपण विचार ठेवला पाहिजे. राजकारणात श्रद्धा आणि संयम महत्वाचा आहे असं मत घाटे यांनी मांडलं. ते लेट्सअप मराठीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

त्याचबरोबर मी बापट साहेब यांच्या मतदारसंघातूनही उमेदवारी मागितली होती. पुढे हेमंत रासणे यांच्यावेळीही उमेदवारी मागितली. पण उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी काही बंडखोरी केली नाही. दुसऱ्याच दिवशी कामाला लागलो. शेवटी उमेदवारी मागणं हे आपलं काम असलं तरी ती द्यायची की नाही हे पक्ष नेतृत्व ठरवतं असंही घाटे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी अमोल बालवडकर यांच्याविषयीही भाष्य केलं. बऱ्याचदा एकाच प्रभागात अनेक उमेदवार तुल्यबळ असतात त्यामुळे पक्ष कधीतरी त्यातील जो इच्छूक आहे त्याच्या पलिकडे दुसऱ्याचाही विचार करु शकतं आणि तसं अनेकदा होत असंही ते म्हणाले.

अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचं बिनविरोध सत्र; पनवेलमध्ये 7 जण बिनविरोध, रविंद्र चव्हाणांची जादू चालली

125 जागा निवडून येतील असा विश्वास आपल्याला आहे त्याला आधार काय? या प्रश्नावर बोलताना घाटे म्हणाले, गेल्या निवडणुकीत 15 चे 20 जागांवर आम्ही फार थोड्या मतांनी पराभूत झालो होते. त्यानंतर आम्ही गेल्या 6 ते 8 आठ वर्षांपासून त्या ठिकाणी भाजप म्हणून जोरदार पद्धतीने काम करतोय. त्याचबरोबर केंद्रात राज्यात आमचं सरकार असल्याने अनेक योजनेच्या माध्यमातून लोकांची काम केलं आहे. त्यामुळे यावेळी आम्ही 125 जागांवर विजय होणार असा आम्हाला विश्वास आहे.

पुण्यात गणेश बीडकर निवणूक प्रमुख आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ प्रभारी आहेत. तर यांच्यापुढे तुमचा निभाव लागतो का? तुमचं ते ऐकतात का असं विचारल्यावर ते म्हणाले, असं काही नाही, मोहळ आणि मी गेली 30 वर्षांपासून सोबत काम करतोय. आज ते केंद्रीय मंत्री आहेत. आणि गणेश बीडकर आणि माझेही चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांचंच चालत आणि आमचं नाही असं नाही. शहरात दुसरेही अनेक मोठे नेते आहेत, त्यामुळे शहराध्यक्ष म्हणून आम्ही प्रदेशाच्या नेतृत्वाकडं सगळं काही पाठवतो आणि त्यावर अंतिम निर्णय होते असंही घाटे म्हणाले.

उमेदवारी अर्ज भरला, त्याची छानणी झाली, आणि उमेदवार अंतिम झाली. पण प्रसार माध्यमांमध्ये ती यादी आली नाही त्याचं काय कारण यावर बोलताना, घाटे म्हणाले,हे चित्र उद्या स्पष्ट होईल. सर्व प्रभागांमध्ये जे उमेदवार अंतिम झालेत त्यांची यादी येईल. काही ठिकाणी कार्याकर्त्यांनी अर्ज दाखल केला आहे तो मागं घेण्याचं नियोजन होत. त्यामुळे यादीला विलंब झाला आहे. हे सगळ होऊन लवकरच यादी माध्यमांसोर येईल असं ते म्हणाले.

दरम्यान, मित्रपक्षांना दुय्यम वागणूक दिली का ? यावर बोलताना ते म्हणाले, आमचा युतीचा प्रयत्न होता. परंतु, जागांची मागणी काही मान्य होण्यासारखी नव्हती. तसंच, आरपीआयचा 10 जागांचा प्रस्ताव मान्य केला. शिवसेनेचा 15 जागांचा प्रस्ताव मान्य केला. पण, त्यांना तो मान्य झाला नाही आणि त्यांचा आम्हाला मान्य झाला नाही. त्यामुळे शेवटी आम्ही सर्व जागांवर लढत आहोत असं घाटे यावेळी म्हणाले.

follow us