प्रतापराव जाधवांच्या विरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला, नरेंद्र खेडेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Buldhana Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू झाली. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपाची चर्चा सुरू आहे. अशातच आता ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातून आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्या विरोधात ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांना तिकीट देण्यात येणार आहे.
महिला सन्मान बचतपत्र योजना आहे तरी काय? कोणाला मिळणार फायदा?
लोकसभा निवडणुकीसाठीआता सर्वच राजकीय पक्षांमध्ये घडामोडींना वेग आला आहे. त्यानुसार यंदा बुलडाणा लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत. त्यासाठी ठाकरे गटाकडून जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली. ईशान्य मुंबई मतदारसंघाचे माजी खासदार संजय दिना पाटील यांना ठाकरे गटाने नोव्हेंबर महिन्यात उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर आता ठाकरे गटाने खेडेकर यांच्या रुपाने आपला दुसरा उमेदवार जाहीर केला आहे.
Share Market Crashed : सेन्सेक्स 1243 अंकांनी घसरला, जाणून घ्या बाजार कोसळण्याची कारणं
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 21 आणि 22 फेब्रुवारीला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते नरेंद्र खेडेकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करतील.
मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची आज बैठक पार पडली, या बैठकीला संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आदी अधिकारी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केल्याचे वृत्त आहे. यापूर्वी नरेंद्र खेडेकर हे जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख राहिलेले आहेत. ते सध्या बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम बघत आहेत. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे.
महाविकास आघाडीत बुलढाण्याची जागा ठाकरे गटाकडे असणार आहे. या मतदार संघात सध्या शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रतापराव जाधव खासदार आहेत. आता ठाकरेंना या मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळे बुलढाण्यात जाधव विरुध्द खेडेकर अशी लढत होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा लोकसभेचा आढावा घेतला होता. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार त्यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. तर आता माझ्यासोबत राहिलेल्या निष्ठावंतांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवा, असे आदेश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत.