महिला सन्मान बचतपत्र योजना आहे तरी काय? कोणाला मिळणार फायदा?

महिला सन्मान बचतपत्र योजना आहे तरी काय? कोणाला मिळणार फायदा?

Government Schemes : देशातील महिलांना सक्षम करण्यासाठी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman)यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी महिला सन्मान बचत पत्र योजनेची (Mahila Samman Saving Certificate Scheme) घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना बचत करण्याची संधी मिळणार आहे. महिला सन्मान बचत पत्रांतर्गत महिला किंवा मुलींच्या नावे लाखो रुपये गुंतवून चांगले व्याज मिळते.

राज्यसभा, ईडी चौकशी की झिशानचे फ्युचर? बाबा सिद्दकींनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यामागे काय कारण?

महिला सन्मान बचतपत्र योजनेंतर्गत, हे खाते किमान 1000 रुपयांनी उघडता येते. या योजनेंतर्गत महिला आणि मुली जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करु शकतात. महिलांना बचत प्रमाणपत्रे खरेदी करण्यासाठी सरकारकडून (Central Govt)दोन वर्षांपर्यंतची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशातील कोणतीही महिला किंवा मुलगी 31 मार्च 2025 पर्यंत हे खाते उघडू शकते. आणि अधिक व्याजदराचा फायदा मिळवू शकते.

एकमेकांच्या तोंडाकडेही न बघणाऱ्या सलमान-शाहरुखमध्ये बाबा सिद्दीकींनी ‘मैत्री’ घडवली होती…

योजनेचे फायदे काय?
देशातील महिला आणि मुलींना बचतीचे फायदे देण्यासाठी 1 फेब्रुवारी 2023 रोजी महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा करण्यात आली.

-हे खाते महिला सन्मान बचत पत्रात किमान 1000 रुपयांमध्ये उघडता येते.
– बचत प्रमाणपत्रे खरेदी करण्यासाठी 2 वर्षांपर्यंतची कालमर्यादा निश्चित केली आहे.
– तुम्ही जमा केलेल्या रकमेवर सरकार तुम्हाला 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते.
– महिला सन्मान बचत पत्रावर PPF, NSC सारख्या इतर सरकारी बचत योजनांपेक्षा जास्त व्याज मिळेल.
– तुमचे पैसे दोन वर्षांसाठी जमा राहतील, त्यानंतर तुम्हाला जमा केलेली रक्कम व्याजासह परत दिली जाते.
– देशातील कोणतीही महिला किंवा मुलगी 31 मार्च 2025 पर्यंत हे खाते उघडू शकते.
– 30 मार्च 2025 पर्यंत कोणतीही महिला किंवा मुलगी हे खाते उघडून उच्च व्याजदराचा लाभ घेऊ शकते.
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली खाते उघडू शकतात.
– महिला सन्मान बचत खात्यात पैसे जमा केल्यानंतर, आवश्यक असल्यास, तुम्ही या खात्यातून काही पैसे काढू शकता.
– या योजनेत पैसे काढण्यासाठी तुम्हाला कालावधीचे बंधन नाही.
– या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.

योजनेसाठी आवश्यक पात्रता :
– महिला सन्मान बचत पत्र खाते उघडण्यासाठी, अर्जदार मूळचा भारतीय असणे आवश्यक आहे.
– या योजनेंतर्गत फक्त महिला आणि मुली खाते उघडण्यासाठी पात्र असतील.
– कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली महिला सन्मान बचत खाते उघडू शकतात.
– सर्व धर्म, जातीतील महिला व मुली बचत पत्राचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड झेरॉक्स
– दोन पासपोर्ट साईझ फोटो
– खात्यावर 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या महिलांना पॅन कार्ड अनिवार्य.

महिला सन्मान बचत योजनेंतर्गत एकदा खाते उघडल्यानंतर पुन्हा तीन महिन्यापर्यंत दुसरे बचत खाते उघडता येणार नाही.

(टीप : योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात, तरी वाचकांनी सदर माहितीची पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube