Budget 2026 : अर्थसंकल्पाचा पार्ट B नेमका काय? 75 वर्षांनंतर बदलला फॉर्मेट जाणून घ्या डिटेल्स

साधारणपणे, अर्थसंकल्पीय भाषणाच्या पार्ट A  मध्ये बरीच माहिती असते, तर पार्ट B मध्ये फक्त काही घोषणा असतात.

  • Written By: Published:
Budget 2026 : अर्थसंकल्पाचा पार्ट B नेमका काय? 75 वर्षांनंतर बदलला फॉर्मेट जाणून घ्या डिटेल्स

अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत आज (दि.1) देशाचा अर्थसंकल्प सादर करत असून, अर्थमंत्री म्हणून सीतारमण यांचा हा सलग नववा अर्थसंकल्प आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प विशेष असणार आहे, कारण हा अर्थसंकल्प वेगळ्या पद्धतीने सादर केला जाणार असून, 75 वर्षात झालेला हा बदल नेमका काय? त्याबद्दल जाणून घेऊया…

यावेळी काय खास असेल?

साधारणपणे, अर्थसंकल्पीय भाषणाच्या पार्ट A  मध्ये बरीच माहिती असते, तर पार्ट B मध्ये फक्त काही घोषणा असतात. मात्र यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण पार्ट B मध्ये सविस्तर भाषण देणार आहेत. अर्थसंकल्पीय भाषणाच्या पार्ट B मध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर भर दिला जाणार असून याबाबतचे स्पष्टीकरण दिले जाणार आहे. अर्थसंकल्पीय भाषणाच्या पार्ट B मध्ये भारताचे आर्थिक दृष्टिकोन आणि प्राधान्यक्रमांची रूपरेषा दर्शविली जाईल.

पार्ट B मध्ये इतर कोणत्या गोष्टींचा उल्लेख केला जाईल?

वरील गोष्टींसह पार्ट B मध्ये भारताच्या क्षमता आणि त्या जगासमोर सादर करण्यासाठी एक रोडमॅपदेखील अधोरेखित करू शकतो. त्यामुळे  अर्थसंकल्पीय भाषणाच्या पार्ट B कडे जगभरातील अर्थशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांकडून लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष यात केंद्रित केले जाईल. ज्यात सरकार तात्काळ आर्थिक वाढ, राजकोषीय शिस्त आणि सामाजिक कल्याण यांचा समतोल कसा साधेल, तसेच आवश्यक दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणांना कसे पुढे नेईल याची रूपरेषा यात मांडली जाईल.

follow us