शक्तिकांत दास अर्थमंत्री तर श्रीकांत शिंदे, राघव चढ्ढा अन् नितीश कुमारांना संधी? जाणून घ्या मोदींच्या नवीन मंत्रिमंडळाची संभाव्य यादी
Shaktikanta Das : गेल्य काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा जोराने असून या मंत्रिमंडळाता कोणाला संधी मिळणार
Shaktikanta Das : गेल्य काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा जोराने असून या मंत्रिमंडळाता कोणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळात संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी फेरबदल होऊ शकतो. या फेरबदलात काही मंत्र्यांना बाहेरचा रास्ता दाखवला जाऊ शकतो तर काहींची खाती बदलण्यात येणार असं सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे देशाला नवीन अर्थमंत्री देखील मिळणार असल्याची देखील चर्चा आहे. माजी आयएएस अधिकारी आणि आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) देशाचे नवे अर्थमंत्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. तर निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. नीट पेपरफुटी प्रकरणात विरोधक धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
नवीन मंत्रिमंडळात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) , राघव चढ्ढा यांच्यासह बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना देखील स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर मनोहर लाल खट्टर, अश्विनी वैष्णव, हरदीप सिंग पुरी आणि नितीन गडकरींची खाती बदलली जाऊ शकते. मंत्रिमंडळातील फेरबदलादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पसंतीचा विचार केला जाऊ शकतो कारण भाजप नेत्यांनी अलीकडेच संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, रवनीत बिट्टू यांच्यावर पंजाबमधील निवडणुकीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, तर तरुण चुग यांना केंद्रीय मंत्रिमंडळात (Narendra Modi Cabinet) स्थान मिळण्याची शक्यता आहे.
शक्तिकांत दास यांचे वय सध्या 69 वर्षे आहे. त्यांना सरकारी सेवा आणि आर्थिक बाबींचा दांडगा अनुभव आहे. जर त्यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली, तर ते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांच्या पंक्तीत सामील होतील. सी.डी. देशमुख हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते आणि त्यांनी 1950 ते 1956 या काळात अर्थमंत्री म्हणून काम पाहिले होते. दुसरीकडे, डॉ. मनमोहन सिंग यांनी 1982 ते 1985 या काळात आरबीआय गव्हर्नर म्हणून, त्यानंतर 1991 ते 1996 या काळात अर्थमंत्री म्हणून आणि पुढे 2004 ते 2014 या काळात देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले. शक्तिकांत दास सध्या संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना सहा महिन्यांच्या आत राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. उत्तर प्रदेशातून त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण नोव्हेंबर 2026 मध्ये उत्तर प्रदेशमधील 10 जागा रिक्त होणार आहेत.
अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा युद्ध? 24 तासांत दुसऱ्यांदा मोठा हल्ला करत ट्रम्पने दिली धमकी-
मोदी मंत्रिमंडळातील संभाव्य नवीन मंत्री
नितीश कुमार
शक्तिकांत दास
सुखेंदू शेखर रॉय
तरुण चुघ
राघव चढ्ढा
श्रीकांत शिंदे
अनुराग ठाकूर
ज्या मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात किंवा ज्यांना वगळले जाऊ शकते
मनोहर लाल खट्टर
रवनीत सिंग बिट्टू
अश्विनी वैष्णव
धर्मेंद्र प्रधान
निर्मला सीतारामन
हरदीप सिंग पुरी
नितीन गडकरी