शिक्षण व्यवस्था नोकरी-उद्योजकतेसाठी अपुरी; निर्मला सीतारामन यांची स्पष्ट कबुली
निर्मला सीतारामन यांनी भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना ती तरुणांना नोकरी किंवा उद्योजकतेसाठी पुरेसे तयार करत नसल्याचं म्हटलं.
Nirmala Sitharaman on India’s Education System : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशातील शिक्षणव्यवस्थेवर (Education System) भाष्य करताना सध्याचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नोकरीसाठी किंवा उद्योजक बनवण्यासाठी पुरेसे तयार करत नसल्याचं म्हटलं आहे. केवळ पदवी किंवा प्रमाणपत्र देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य आणि त्याचा बाजारपेठेत वापर कसा करायचा, याचं प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रत्येक गोष्टीवर ‘ठीक आहे’ म्हणणाऱ्यांच्या मनात नेमकं काय सुरू असतं? मानसशास्त्र काय सांगत
सीतारामन म्हणाल्या की, सध्या आपण ज्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतो आणि शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतो, ते अभ्यासक्रम आपल्याला नोकरीसाठी तयार करत नाहीत. विशेष म्हणजे, हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठीही पुरेसे तयार करत नाहीत. “तुम्हाला कोणासाठी तरी काम करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःही काहीतरी करू शकता. मात्र सध्याचे अभ्यासक्रम त्यासाठी पुरेसे मार्गदर्शन देत नाहीत,” असं त्यांनी सांगितलं.
विकसित देशांमधील शिक्षणपद्धतीचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, तिथे तरुणांना त्यांच्या आवडीच्या विषयात उच्च शिक्षण घेण्यासोबतच स्थानिक तांत्रिक विद्यापीठांमध्ये जाऊन विशिष्ट कौशल्य शिकण्याची संधी दिली जाते. त्यानंतर त्या कौशल्याचा वापर कसा करायचा, त्यातून कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून व्यवस्थापनाच्या क्षेत्रात किती पुढे जाता येईल, याचंही मार्गदर्शन केलं जातं.
समाज कल्याणच्या पैशांबाबत कायदा करा; लाडक्या बहिणीसाठी वळवल्याचा आरोप करत आठवलेंची मागणी
अशा प्रकारची शिक्षणव्यवस्था विद्यार्थ्यांना नोकरी करणारा कर्मचारी किंवा स्वतःचा व्यवसाय करणारा उद्योजक, या दोन्ही भूमिकांसाठी तयार करते. मात्र भारतातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये ही बाब पुरेशा प्रमाणात दिसत नसल्याचं सीतारामन यांनी म्हटलं.
‘BA केल्यानंतर पुढे काय?’
विद्यार्थ्यांना पदवी मिळाल्यानंतर त्यांच्या पुढील करिअरचा मार्ग स्पष्ट नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. “तुम्ही अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास केला, तर त्यानंतर काय करता? BA केल्यानंतर MA करता. पण MA केल्यानंतर तुमच्याकडे काहीतरी कौशल्य असायला हवं,” असं त्या म्हणाल्या.
नितीन नबीन यांच्या नव्या टीमची घोषणा, भारती पवार, तावडे कुणा-कुणाला संधी
आपल्या काळातील UGCच्या परीक्षेचा संदर्भ देताना त्यांनी ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि त्यानंतर सीनियर रिसर्च फेलोशिप (SRF)च्या माध्यमातून संशोधनाची संधी उपलब्ध असल्याचं सांगितलं. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याने JRF किंवा SRF केलं नाही. त्यामुळे पदवी घेतल्यानंतर पुढे काय करायचं, हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
‘पदवीधर तयार झाले, पण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तयार नाहीत’
सध्याच्या व्यवस्थेने मोठ्या प्रमाणावर पदवी आणि प्रमाणपत्र मिळवलेले तरुण तयार केले आहेत. मात्र हे तरुण कर्मचारी म्हणून काम करण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्यांसह तयार झालेले नाहीत, अशी टीका सीतारामन यांनी केली.
छत्रपती संभाजीनगरात दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात; ढाब्यावर कुक, वेटर म्हणून करत होते काम
काही तरुणांना शेवटी आपल्या पालकांच्या व्यवसायात सहभागी व्हावं लागतं. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेत असा बदल करण्याची गरज आहे की, पदवीसोबतच तरुणांना प्रत्यक्ष कौशल्य, रोजगाराच्या संधी आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्याची क्षमता मिळेल, अशी भूमिका निर्मला सीतारामन यांनी मांडली.