चूक यंत्रणेची मग शिक्षा विद्यार्थ्यांना का?, ‘TET’ पेपर लीकवरून मुख्यमंत्र्यांकडं केल्या तीन महत्त्वाच्या मागण्या
अन्यायाविरुद्ध आता शांत बसणार नाही,” असा इशारा देत राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदलांची गरज असल्याचे म्हटलं आहे.
नीट पेपरनंतर महाराष्ट्रामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फूट प्रकारामुळं राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. या गंभीर मुद्द्यावरून आता काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट सरकारवर घणाघात केला आहे. चूक यंत्रणेची, मग त्याची शिक्षा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना का? असा संतप्त सवाल विचारत राहुल गांधींनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडं तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत.
महाराष्ट्रात झालेल्या TET परीक्षेतील गोंधळामुळं तब्बल ६ लाख उमेदवारांचं भवितव्य अंधारात सापडलं आहे. परीक्षा रद्द होऊन दोन आठवडे उलटून गेले तरीही अद्याप नवीन तारखेचा पत्ता नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला धारेवर धरलं आहे. जे देशाचे आणि राज्याचे भविष्य घडवणार आहेत, तेच आज स्वतःच्या भविष्यासाठी अंधारात चाचपडत आहेत असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
PM मोदी हट्टीपणा सोडा, देशात प्रामाणिकपणाला किंमत नाही; सोनम वांगचुक यांचा पंतप्रधानांना संदेश
या भावी शिक्षकांनी वर्षानुवर्षे मेहनत केली, फॉर्म भरले, भरमसाठ फी दिली आणि परीक्षा देण्यासाठी दूरवरची केंद्रे (सेंटर्स) गाठली. पण आज त्यांच्या पदरी केवळ प्रतीक्षा आणि निराशा आली आहे. पेपर फोडणारे मोकाट फिरत आहेत, भ्रष्ट यंत्रणा स्वतःला वाचवत आहे आणि यात भरडला जात आहे तो फक्त प्रामाणिक उमेदवार. दरम्यान, या गोंधळावर तातडीने तोडगा काढण्यासाठी राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्र्यांना संबोधित करत तीन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत:
17 जुलैला डेहराडूनमध्ये युवा क्रांती’चा एल्गार
अन्यायाविरुद्ध आता शांत बसणार नाही,” असा इशारा देत राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदलांची गरज असल्याचे म्हटले आहे. पेपरफुटीच्या या देशव्यापी समस्येवर आणि तरुणांच्या भविष्याशी होत असलेल्या खेळखंडोब्यावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांनी १७ जुलै रोजी डेहराडून येथे एका विशेष सभेचे आयोजन केले आहे.
आता देशात शिक्षण क्रांतीची वेळ आली आहे. अशी व्यवस्था निर्माण करायची आहे, जिथे तरुणांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल, यंत्रणेच्या अपयशाची शिक्षा नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. दरम्यान, TET पेपरफुटीमुळे हवालदिल झालेल्या महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थींकडून राहुल गांधी यांच्या या भूमिकेला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळत असून, आता राज्य सरकार यावर काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागण्या काय?
1. नवे वेळापत्रक: महा-TET परीक्षेची नवीन तारीख आजच्या आज जाहीर करण्यात यावी.
2. उत्तरदायित्व: पेपरफुटीला जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करा; प्रामाणिक उमेदवारांना त्रास देऊ नका.
3. वयोमर्यादेत सवलत: या पेपरफुटीमुळे ज्या उमेदवारांचे महत्त्वाचे वर्ष वाया गेले आहे, त्यांना वयोमर्यादेत शिथिलता (सवलत) देण्यात यावी.
महाराष्ट्र TET का पेपर लीक हुआ, परीक्षा रद्द हुई। 6 लाख अभ्यर्थी अधर में। दो हफ्ते हो गए, नई तारीख़ का कोई अता-पता नहीं।
लीक करने वाले आज़ाद, सिस्टम बेदाग़ और सज़ा भुगत रहा है वो जिसने ईमानदारी से मेहनत की।
ये देश के कार्यरत और होने वाले शिक्षक हैं जिनके हाथ में भारत का भविष्य…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 14, 2026