टीईटी पेपर फुटी प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन
परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आज उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला आहे. (TET) टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे पेपर फुटल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. अशातच या घटनेनंतर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
टीईटी पेपर फुटी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. ठाण्याचे जॉईंट सीपी पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेत SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. TET प्रकरणी सरकार अँक्शन मोडवर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक यांना फोन करुन आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करा. कुणाचीही गय करु नका असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसंच, दादा भुसे यांनाही मुख्यमंत्र्यांनी फोन केला आहे.
TET पेपर लीकप्रकरणी पोलिसांकडून धक्कादायक माहिती; दिल्ली हरियाणा कनेक्शन काय?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि, आज 27 जून, 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली.
यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. या नीट परिक्षेच्या पेपरफुटीमागे महाराष्ट्रातील प्रमुख आरोपी समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षाचे पेपर फुटल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे.