वारेमाप खर्च अन् ‘ती’ चिंता म्हणून तेव्हा प्रकल्प थांबला; मिसिंग लिंकवरून भाजपच्या टीकेला पृथ्वीराज चव्हाणांचं प्रत्युत्तर

Prithviraj Chavan यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना भाजपकडून केल्या जाणाऱ्या मिसिंग लिंकवरूनच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Prithviraj Chavan १

Prithviraj Chavan’s retort to BJP’s criticism regarding the ‘Missing Link’ : महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. (BJP) मुंबई आणि जवळच्या शहरातही पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यात मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळून सुमारे 18 तास वाहतूक बंद राहिली होती. यावरून यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने हा प्रकल्प होऊ दिला नाही अशी टीका केली जात आहे. याला पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.

नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

मिसिंग लिंकबाबत लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. मिसिंग लिंकचं काम आम्ही होऊ दिलं नाही. अशी चर्चा सुरू आहे पण हा प्रकल्पाच आम्ही आणला मग तो का होऊ दिला नसता. या प्रकल्पाला स्थगिती देण्यामागे कारणं असे होते की, त्याचे कॅल्युलेशन्स पुन्हा करा, सेफ्टी चेक आणि आणखी अभ्यास करा. धोका नाही याची खात्री करा. याचा खर्च आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध नव्हता तर फक्त चिंता होती की देशात अजून असा प्रकल्प झाला नव्हता. असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मिसिंग लिंकला त्यांनी का स्थगिती दिली? मिसिंग लिंकच्या कामावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

भ्रष्टाचारचा तपास केला का? 40 टक्के कमिशनच्या प्रथेमुळेच… मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर आरोप

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यात या मिसिंक लिंगसाठी ट्रक्चरल इंजीनिअर्सने देखील चांगल काम केलं. जेव्हा त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं तेव्हा मात्र या रस्त्याच्या किंमती 50 टक्क्यांनी वाढल्या. त्यात महाराष्ट्रात भाजप सरकारच्या काळात 40 टक्के कमिशन घेण्याची प्रथा जी पडलेली आहे. त्यात सिमेंट, वाळू या सर्वात जो काही भ्रष्टाचार झाला. त्याचा तपास कोणी केला का? आमचं सरकार आल्यावर तो तपास आम्ही करूच

FIFA World Cup 2026 ‘गोल्डन बूट’ साठी जोरदार लढत, मेस्सी की एमबाप्पे कोण मारणार बाजी?

जर आमदार खरेदी करण्यासाठी 40-50 खोक्यांचा विषय जो महाराष्ट्रात चर्चेला येतो. त्यासाठी पैसे कुठून येतात? हे सर्व पैसे रस्त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमधून येतात. म्हणूनच तुम्हाला समृद्धी महामार्ग हवा होता आणि आता शक्तिपीठ मार्ग हवा आहे. यातून हा धोका निर्माण होऊ शकतो की, जर डिझाईन प्रमाणे काम झालं नाही तर जर तुम्हा डोंगरांचे कोपरे तोडले तर चिंतेचा विषय आहे. आता जे घडतयं ते त्याबद्दल चिंता वाटण्यासारखचं आहे.

follow us