Eknath Khadse : एकनाथ खडसेंवर 509 सारखा गुन्हा; आमदार चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

Eknath Khadse : एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीच्या कायद्यानुसार 509 सारखा गुन्हा दाखल आहे अशी टीका

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Eknath Khadse

Eknath Khadse : एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीच्या कायद्यानुसार 509 सारखा गुन्हा दाखल आहे अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु असल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे अपघाती मंत्री होते, त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही धोबीपछाड देत आहोत. खडसेंना आम्ही नगरपंचायतीमध्ये जागा दाखवली. विधानसभेत जागा दाखवली आहे. एकनाथ खडसे यांनी प्रत्येक वेळेस स्वत:च्या पक्षाशी गद्दारी केली आहे. खडसे परिवाराला भाजपने मोठ मोठी पदे दिली मात्र असे असतानाही त्यांचे झाले नाहीत. 35 वर्षात खडसे मुक्ताईनगर (Muktainagar) मतदारसंघात काहीही करु शकले नाही अशी टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांच्यावर केली.

एकनाथ खडसे यांनी आपल्या फार्म हाऊसची ड्रोनद्वारे रेकी केल्याचा संशय व्यक्त केला होता. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला त्यांच्या बुद्धीमतेची कीव करावीशी वाटते. पायलट ट्रेनिंग कंपनीची विमान या मार्गाने जात असतात. त्यामुळे माध्यमांना रेकीची माहिती देण्यापूर्वी खडसे यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली पाहिजे होती असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

न्यूझीलंडला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या मालिकेतून ‘हा’ स्टार गोलंदाज बाहेर

तर दुसरीकडे या आरोपांवर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, माझ्यावर राजकीय गुन्हे वगळता साधी एक एनसीसुद्धा दाखल नाही. सराईत गुन्हेगार हे कुणाला म्हणतात तर चंद्रकांत पाटील यांच्यासारख्यांना म्हणतात. त्यांच्यावर 307 चे गुन्हे दाखल होते, तडीपारीची नोटीस तयार होती असं माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले.

follow us