वंचितला भाजपची ‘बी टीम’ ठरवणारे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर गप्प का? अंजली आंबेडकर संतापल्या
Anjali Ambedkar on Sharad Pawar and Supriya Sule अंजली आंबेडकर यांनी डीलिमिटेशनला पाठिंबा देणाऱ्या पवार आणि सुळेंवरून संताप व्यक्त केला आहे.
Anjali Ambedkar on who labeled Vanchit as BJP’s ‘B-team’remaining silent on Sharad Pawar and Supriya Sule : वंचित बहुजन आघाडी या प्रकाश आंबेडकरांच्या पक्षावर नेहमीच भाजपची बी टीम म्हणून टीका होत असते. त्यावरून आता प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर यांनी भाजपच्या डीलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवरून सवाल विचारत संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंजली आंबेडकर?
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या परिसीमन विधेयकाला (Delimitation Bill) पाठिंबा देण्याच्या अलीकडील निर्णयावर टीका करणारे खुले पत्र किती स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी लिहिले? शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भाजपची ‘बी टीम’ म्हणणारे निर्भय बनो आंदोलनातील किती कार्यकर्ते पुढे आले?
वंचित बहुजन आघाडी (VBA) केवळ स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून तिला भाजपची ‘बी टीम’ ठरवण्यासाठी उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनो आंदोलनातील कार्यकर्ते नेहमीच तत्पर असतात. मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात, तेव्हा अचानक या सर्वांचे आवाज का बंद होतात? २०२४ च्या निवडणुकीत ज्या प्रबळ राजकीय पक्षांचा त्यांनी उत्साहाने प्रचार केला, त्याच प्रस्थापित जातीय वर्चस्व असलेल्या पक्षांना प्रश्न विचारण्याची वेळ येते, तेव्हा हेच उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनो आंदोलनातील कार्यकर्ते मौन का बाळगतात?
ही वैचारिक विसंगती नाही, तर राजकीय सोय आणि जातीय समीकरणांमधून निर्माण झालेला निवडक संताप आहे! त्यांच्या राजकीय नैतिकतेत कमालीचा दुहेरीपणा दिसून येतो. बहुजनांच्या राजकीय अस्मितेवर आणि स्वतंत्र राजकीय अस्तित्वावर ते सतत प्रश्न उपस्थित करतात. वंचित बहुजन आघाडीच्या स्वतंत्र राजकीय भूमिकेची वारंवार चिकित्सा करतात. मात्र, भाजपच्या सामाजिक आणि राजकीय अजेंड्याला बळकटी देणाऱ्या सवर्ण राजकीय पक्षांबाबत मात्र कमालीची उदार भूमिका घेतात.
How many feminists wrote an open letter to Sharad Pawar and Supriya Sule criticising them for the recent decision to support the BJP’s Delimitation Bill?
How many Nirbhay Bano activists called Sharad Pawar and Supriya Sule as BJP’s B-Team?
Upper-caste feminists, purogamis, Nirbhay Bano activists are quick to label the VBA as the BJP’s B-Team simply because it contests elections independently. But when Sharad Pawar and Supriya Sule openly help the BJP politically, suddenly their voices disappear. The same Upper-caste feminists, purogamis and Nirbhay Bano activists who are otherwise so vocal seem to develop a remarkable inability to question dominant caste parties for whom they so vigorously campaigned in 2024 elections.
This is not intellectual inconsistency! It is selective outrage rooted in political convenience and caste!
Their political morality have an extraordinary double standard. They police Bahujan political assertion and scrutinise the VBA relentlessly for its independent political existence, but extend extraordinary indulgence to Savarna political parties whose actions are strengthening the BJP’s socio-political project.
The proposed Delimitation Bill by the BJP is even more dangerous than SIR. The Delimitation Bill will disproportionately increases the parliamentary representation of northern states, it could fundamentally distort India’s federal balance, concentrate political power in a regional bloc and undermine the democratic principle of equitable federal representation. This is not some technical parliamentary exercise. It concerns the future of Indian democracy itself.
It is no secret that Sharad Pawar and Supriya Sule are enabling a political process that advances the BJP’s divisive agenda and weakens India’s democratic and federal foundations. But the question is – Why the silence from Upper-caste feminists, purogamis and Nirbhay Bano activists?
Why does the VBA automatically become the BJP’s B-Team for exercising electoral independence, while Sharad Pawar and Supriya Sule who facilitate and legitimise the BJP’s political agenda are spared from being labelled BJP’s B-Team?
Your silence exposes your outrage rooted in political convenience and caste!
It exposes that you are intellectual dishonest, and the hate you have against Bahujan parties.
You are all sold outs!
— Anjali Maydeo Ambedkar (@AnjaliMaydeo) November 23, 2026
भाजपने प्रस्तावित केलेले परिसीमन विधेयक (Delimitation Bill) हे SIR पेक्षाही अधिक धोकादायक आहे. या विधेयकामुळे उत्तर भारतातील राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व प्रमाणाबाहेर वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, भारताच्या संघराज्य व्यवस्थेतील सत्तेचा समतोल बिघडू शकतो. विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील राजकीय शक्तीचे केंद्रीकरण होऊ शकते आणि सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्व मिळण्याच्या लोकशाही तत्त्वाला धक्का बसू शकतो. हा केवळ संसदेतील मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा तांत्रिक विषय नाही, तर भारतीय लोकशाहीच्या भवितव्याशी संबंधित गंभीर मुद्दा आहे.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेणाऱ्या आणि भारताच्या लोकशाही व संघराज्य व्यवस्थेचा पाया कमकुवत करणाऱ्या राजकीय प्रक्रियेला मदत करत आहेत, हे काही लपून राहिलेले नाही. मात्र, प्रश्न असा आहे की, उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि निर्भय बनो आंदोलनातील कार्यकर्ते यावर गप्प का आहेत?
वंचित बहुजन आघाडी केवळ स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून तिला लगेच भाजपची ‘बी टीम’ ठरवले जाते. मग भाजपच्या राजकीय अजेंड्याला मदत करणाऱ्या आणि त्याला वैधता मिळवून देणाऱ्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भाजपची ‘बी टीम’ का म्हटले जात नाही? तुमचे हे मौन राजकीय सोय आणि जातीय समीकरणांवर आधारित तुमचा निवडक संताप उघड करत आहे! यातून तुमचा वैचारिक अप्रामाणिकपणा आणि बहुजनांच्या राजकीय पक्षांविषयी असलेला द्वेषही समोर येतो. तुम्ही सर्वजण आपली भूमिका विकलेले लोक आहात!