विदेशी ताकद यांच्या पाठीशी, भारतात अराजकता…; नितीन नबीन यांचे गंभीर आरोप

Nitin Nabin Allegations Against Congress and CJP; नितीन नवीन यांनी देशात सुरु असलेल्या आंदोलनावरुन राहुल गांधी आणि सीजेपीवर गंभीर आरोप केले.

Nitin Nabin Allegations Against Congress and CJP

Nitin Nabin Allegations Against Congress and CJP: जंतरमंतरवरील काँग्रेस आणि सीजेपीच्या आंदोलनावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. देशातील जनतेला अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असून, यामागे विदेशी शक्तींचा हात असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पुरस्कृत सीजेपी देशात अराजकता निर्माण करत असल्याचा आरोपही नितीन नबीन यांनी केला.

ध्रुव राठीला गुरुग्राममधून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा, सीजेपीच्या आंदोलनापूर्वी मोठी खळबळ

नितीन नबीन म्हणाले, “देशातील 140 कोटी जनता जी सुखा समाधानाने जगत आहे, त्यांनी अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही अराजकता निर्माण करण्याचं काम विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल पुरस्कृत सीजेपी करत आहेत. या दोन्ही गटाला मी स्पष्टपणे सांगतो की, भारतातील जनता तुमच्या या कृत्याला बघत आहे. जनताने यांना निवडणूकीत नाकारल्यामुळे हे देशात अराजकता निर्माण करत आहेत. मी खात्रीशीरपणे सांगतो की, ही अराजकता पसरवण्याचे काम विदेशी ताकदीच्या जोरावर ते करत आहेत.”

मोदींच्या नेतृत्वातील विकास विरोधकांना पचत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत असून, हा विकास विरोधकांना सहन होत नसल्याची टीकाही नितीन नबीन यांनी केली. ते म्हणाले, “आज आपला देश जी प्रगती करत आहेत, जो विकास होत आहे. ती प्रगती, तो विकास विरोधकांना पचवता येत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आम्ही देशाला भीतीच्या वातावरणातून बाहेर काढलं, दहशतवाद, नक्सलवाद नष्ट केला. पण अजूनही अर्बन नक्सलवादी मानसिकतेचे लोकं या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राहुल गांधींचे हे प्रयत्न कधीच पूर्ण होणार नाहीत.”

सीजेपीच्या आंदोलनाआधीच राजधानी दिल्लीत हाय अलर्ट, ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् सीमांवर बीएसएफचा वेढा

जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नितीन नबीन यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. त्यांच्या या विधानामुळे आंदोलनावरून भाजप आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

follow us