तुम्ही देवस्थानाच्या जमिनी अन्… जयंत पाटलांना आव्हान देणाऱ्या धस यांना मेहबूब शेख यांचं प्रत्युत्तर

Suresh Dhas Jayant Patil धस यांनी जयंत पाटलांची बुद्धीमत्ता काढली. त्यावर शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं

Suresh Dhas Jayant Patil

Mehboob Shaikh’s answer to BJP MLA Suresh Dhas, who challenged Jayant Patil : पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये एफडीएच्या कारवाईमुळे दूध भेसळीचा मुद्दा चर्चेत आला होता. या प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली असतानाच, विधासभेतील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी नाव न घेता बीडमधील एका आमदाराच्या पत्नीवर गंभीर आरोप करत सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटलांवर जोरदार टीका केली. त्यांनी थेट जयंत पाटलांची बुद्धीमत्ता काढली. त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी धस यांना जोरदार प्रत्युत्तर देत जुन्या प्रकरणांचा उल्लेख केला आहे.

नेमकं काय म्हणाले मेहबूब शेख?

भाजप आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटलांबाबत जे वक्तव्य केलं. त्यावरून हे दिसून येत की, जिनके किरदार मैले होते है अक्सर वो दुसरों के किरदार पर उंगली उठाते है. धस म्हणाले की, जयंत पाटलांपेक्षा आम्हाला देवाने जास्त बुद्धी दिली. पण तिचा वापर कसा करायचा हा नैतिकतेचा भाग आहे. जयंत पाटलांनी त्यांच्य बुद्धीचा वापर त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाने उभारून केला. पण धस बुद्धीचा वापर कसा करतात तर त्यांच्यासोबत 9-9 वर्ष जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अत्याचाराचे गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्धवस्त केलं. देवस्थानाच्या जमीनी हडप करण्यासाठी डोक्याचा वापर करत आहेत.

जयंत पाटलांनी नाव घेतलं नाही, मग मिरच्या झोंबल्या का?

जयंत पाटलांना कधी असा बुद्धीचा वापर केला नाही. धस राज्यमंत्री असताना देवस्थानच्या जमिनींच्या कशा ऑर्डर झाल्या? मार्केट व्हॅल्यूच्या किती टक्के पैसे गोळ केले? आता देखील नगर पंचायतचा घन कचरा देखील कास पुरत नाही? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. अगदी बुट्ट्या गायकवाडच्या खून प्रकरणापासून ही यादी मोठी आहे. बात निकली तो दूर तक जायेगी. जयंत पाटील काय म्हणाले? की बीड जिल्ह्यातील एका आमदाराच्या पत्नीने दूध भेसळीसाठी दम दिला. तो आमदार कोण? त्यामुळे बीडमध्ये 6 आमदार आहेत. त्यात एक महिला सोडली तर 5 आमदार त्यांचेही लग्न झालेले आहेत. त्यामुळे ती कोणत्या आमदाराची पत्नी हे समोर आलेलं नाही. जयंत पाटलांनी कुणाचं नाव घेतलेलं नाही. मग तुम्हाला का मिरच्या झोंबल्या?

तुम्हाला म्हणाचय का की फडणवीसांनी महाराष्ट्र लुटलाय?

तसेच तुम्ही ऑनलाईन जीआरचा मुद्दा जो घेतलाय त्यावर 20 हजार कोटींचे टेंडर काढण्यात आले आहेत. त्यावर तत्कालीन जलसंपदा मंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना सह्या केल्या आहेत. मग तुम्हाला म्हणाचय का की त्यांनी महाराष्ट्र लुटलाय? त्यामुळे दूध भेसळ कुणी केली? त्या आमदाराच्या बायकोचं नाव समोर यायला नको? बुट्ट्या गायकवाडला कुणी मारलं? हे समोर यायला नको. प्रकाश आंबेडकर आले तेव्हा आदिवासी महिलेला साडी काढून पळवायची वेळ का आली? आम्ही हे सगळं पुढच्या अधिवेशनात काढू. तुम्हाला बोलता येत आम्हालाही देवाने थोडंफार दिलंयं. त्यामुळे एवढचं सांगतो आंधळ्याने आरसा विकायचा नसतो अन् ज्याचं जगण खोटं असतं त्यांनी सत्याचं भजन गायचं नसतं असं म्हणत मेहबूब शेख यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.

follow us