Rakhi Agarwal : मोदी जी न्याय द्या, 20 दिवसात 2 पिढ्या संपल्या अन्… राखी अग्रवाल यांचा PM मोदींना पत्र
Rakhi Agarwal : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल प्रकरणात न्याय मिळण्यासाठी केतनची आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान मोदी यांना
Rakhi Agarwal : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल प्रकरणात न्याय मिळण्यासाठी केतनची आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहित न्यायची मागणी केली आहे. 18 जून रोजी पुण्यातील लोहगड किल्ल्यावरुन केतन अग्रवाल यांना दरीत ढकलून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांकडून केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक करण्यात आली असून पुणे ग्रामिण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून सिया आणि चेतन यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना केतनची आई राखी अग्रवाल यांनी पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, माझं नाव राखी अग्रवाल (Rakhi Agarwal) आहे, आणि मी केतन अग्रवालची (Ketan Agarwal) आई आहे. मी कधी कल्पनाही केली नव्हती की मला माझ्या स्वतःच्या मुलासाठी न्याय मागण्याकरिता तुम्हाला पत्र लिहावं लागेल. प्रत्येक आईप्रमाणे, मी केतनला एक सुंदर आयुष्य घडवताना, लग्न करताना आणि आमच्यासोबत म्हातारं होताना पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्याऐवजी, मला माझ्या मुलावर अंत्यसंस्कार करावे लागले. एका आईसाठी यासारखी मोठी वेदना आणि दुसरं कोणी नसतं. माझ्या मुलाची निर्घृणपणे हत्या झाली, आणि त्याच्यासोबत माझी संपूर्ण दुनिया निघून गेली. आमच्या घराचा प्रत्येक कोपरा मला त्याची आठवण करून देतो. त्याची रुम, त्याचे कपडे, त्याचे फोटो आणि त्याच्या हास्याची जागा घेतलेली शांतता, मला रोज आठवण करून देतात की तो कधीही परत येणार नाही.
केतनच्या मृत्यूनंतर अवघ्या वीस दिवसांनी जेव्हा माझ्या सासऱ्यांचे निधन झाले, तेव्हा आमच्या कुटुंबावर आणखी एक हृदयद्रावक आघात झाला. त्यांचं केतनवर खूप प्रेम होतं आणि नातवाला गमावण्याचं दुःख त्यांना सहन झालं नाही. काही दिवसांतच आमच्या कुटुंबाने दोन पिढ्या संपल्या. मोदीजी, मी फक्त एक आई आहे. मी सहानुभूती किंवा कोणत्याही विशेष सवलतीची मागणी करत नाही. मी फक्त न्यायाची मागणी करत आहे. न्यायाशिवाय जाणारा प्रत्येक दिवस आमचं दुःख अधिकच वाढवत आहे. केतन परत येऊ शकत नाही, पण ज्यांनी त्याचा जीव घेतला त्यांना कायद्यानुसार कठोरतम शिक्षा मिळालीच पाहिजे.
PM मोदी हट्टीपणा सोडा, देशात प्रामाणिकपणाला किंमत नाही; सोनम वांगचुक यांचा पंतप्रधानांना संदेश-
बस इतना चाहता हूं कि मेरे बेटे को इन्साफ मिला। हात जोडून मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की, कृपया याची खात्री करा की माझ्या मुलाच्या प्रकरणाकडे योग्य लक्ष दिले जाईल आणि कोणताही विनाकारण विलंब न लावता न्याय मिळेल. कृपया केतनला फक्त एक केस फाईल बनू देऊ नका. तो कोणाचा तरी मुलगा होता, कोणाचा तरी नातू होता, कोणाचा तरी भाऊ होता, पण माझ्यासाठी, तो माझी संपूर्ण दुनिया होता. प्रत्येक रात्री मी त्याच्या फोटोकडे बघते आणि म्हणते, “बाळा, आई अजूनही तुझ्यासाठी लढत आहे.” मी फक्त हीच प्रार्थना करते की एक दिवस मी त्याला सांगू शकेन, “बाळा… तुला न्याय मिळाला.” एका दुःखी आईचा आवाज तुम्ही ऐकाल, अशी मी मनापासून आशा करते. असं राखी अग्रवाल यांनी या पत्रात म्हटले आहे.