अग्रवाल कुटुंबावर दु: खाचा डोंगर; उपचारादरम्यान केतनच्या आजोबांचेही निधन
Ketan Agarwal Grandfather Death : संपूर्ण राज्यात चर्चेत असणाऱ्या पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातून समोर आलेल्या धक्कादायक
Ketan Agarwal Grandfather Death : संपूर्ण राज्यात चर्चेत असणाऱ्या पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात सखोल चौकशी सुरु असताना केतन अग्रवालच्या कुटुंबाला मोठा धक्का लागला आहे.
केतनचे आजोबा देवीचंद किसनलाल अग्रवाल यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर त्यांची मानसिक तणावामुळे प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. याबाबत केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी माहिती दिली आहे. त्यांनी मिस यू डॅड अशी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, देवीचंद अग्रवाल (Devichand Agarwal) हे मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वीच हृदयाशी संबंधित एक मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली होती. मात्र यानंतर केतनची हत्या झाल्याची माहिती समोर आल्याने देवीचंद यांना मोठा मानसिक धक्का बसला असल्याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे अग्रवाल (Ketan Agarwal) कुटुंबीयांवर मोठा दु:खाचे डोंगर कोसळले आहे. देवीचंद अग्रवाल यांची अंत्ययात्रा 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजचा लोढा बेलमांटो सोसायटी येथून निघणार असून निगडी येथील अमरधाम स्मसानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे.
गुंतवणुकीसाठी योग्य वेळ, ‘या’ राशींसाठी आज होणार फायदा; जाणून घ्या सर्वकाही
केतन अग्रवाल हत्या प्रकरण, सिया आणि चेतनला अटक
तर दुसरीकडे केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली आहे. सिया आणि चेतनने 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरुन दरीत ढकलून हत्या केली होती. या प्रकरणात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत सिया आणि चेतनला अटक केली होती.