खासदार बजरंग सोनवणेंच्या पुत्राला अटक?, विलास घुलेंनी मृत्यूआधी सगळं सांगितलं, बीडमध्ये काय घडतय?

आरोपी ज्यावेळी विलास घुले याची हत्या करत होते, त्यावेळी ते सतत सौरभ बजरंग सोनवणेचे नाव घेत होते.

News Photo   2026 06 24T104357.870

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील (Beed) हॉटेल मालक विलास घुले याची हत्या करण्यात आली. भांडण मिटवण्यासाठी गेल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात सुरूवातीपासूनच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे नाव पुढे येत आहे. विलास घुले हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक करा या मागणीसाठी नातेवाईक गेल्या तीन दिवसापासून आक्रमक आहेत. सौरभ बजरंग सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. अखेर पोलिसांकडून मोठे आश्वासन नातेवाईकांना देण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यात हस्तक्षेप केला. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पण जबाबात त्याचे नाव नोंदवण्यात आले. सौरभ सोनवणे हाच या हत्येमागील सूत्रधार असल्याचा आरोप केला जात होता. मात्र, पोलिसांकडून दखल घेतली जात नव्हती आणि आरोपींना अटकही केले जात नव्हते. आक्रमक होत नातेवाईकांनी थेट विकास घुले याचा मृतदेह थेट केज पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आणून ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी मुख्य सुत्रधाराचं नाव टाळलं; बीडच्या खून प्रकरणात धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक

आरोपी ज्यावेळी विलास घुले याची हत्या करत होते, त्यावेळी ते सतत सौरभ बजरंग सोनवणेचे नाव घेत होते. ते व्हिडीओमध्येही स्पष्ट झाले. सौरभ बजरंग सोनवणेच्या पाठबळामुळेच कृत्य घडले, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विलास घुले याचा भाऊ रमेश घुले याने केली होती. मात्र, खासदार बजरंग सोनवणे यांनी आमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

एसपींनी तपास करावा आणि आरोपींनी अटक करावे, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले. अखेर पोलिसांनी या प्रकरणात सौरभ बजरंग सोनवणे याचे नाव जबाबात घेतले. विकास घुले यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला. विलास घुले यांची हत्या नक्की कशी करण्यात आली, याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतली. केज पोलिस ठाण्याबाहेर विलास घुले यांचा मृतदेह तब्बल 9 तास ठेवण्यात आला. रात्री उशिरा आंदोलन स्थगित करण्यात आले. आरोपींना अटक करण्याच्या मागणीचा मुद्दा अधिवेशनात आमदार धनंजय मुंडे आणि नमिता मुंदडा यांनीही मांडला.

follow us