मला विरोध करायला शरद सोनवणे पंतप्रधान आहे का ? शिवसेना प्रवेशावरून आढळराव पाटलांना टोला
Shivajirao Adhalarao- सभापती सहा महिने जेलमध्ये होता. तेव्हा तुम्ही कुठे होता, असे मी विचारले. हे त्यांना रूचले नाही, म्हणून त्यांनी माझी हकालपट्टी केली.
Shivajirao Adhalarao On Sharad Sonwane : माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Adhalarao) यांनी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे ( Sharad Sonwane) यांना पत्रकार परिषदेत जोरदार टोला लगावला आहे. मला शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी विरोध करणारे शरद सोनवणे पंतप्रधान आहेत का ? मला तालुक्यामध्ये बेस आहे. मी तीन टर्म खासदार राहिलेलो आहे. या माणसाचे एेकावे एेवढे एकनाथ शिंदे बाळबुद्धीचे नाहीत, उगच गमजा मारू नये, असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेच्या प्रवेशबाबत ते स्पष्टपणे बोलले मी आहे तिथे ठीक आहे, असे ते म्हणाले.
कोरियामध्ये भाजप नेते भारत सिंह यांच्यासह तिघांचा जिवंत जाळून खून, वाळू उत्खननाच्या वादातून घडले थरारक हत्याकांड
माझं शिवसेना सोडण्याचे कारण वेगळे आहे. स्पष्टपणे पक्ष बदलला आहे. खेड तालुक्याच्या सभापतीवर अन्याय झाला होता. तत्कालीन आमदारांकडून अन्याय झाला होता. उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक वेळा जावून न्याय मिळाला नाही. सहा महिने विनाकारण शिवसेनेचा सभापती जेलमध्ये होता. त्यांच्या पत्नीने टेबलवर येऊन बांगड्या फोडल्या होत्या. अशा शिवसेनेचे काय करू असा सवाल आढळराव पाटलांना उपस्थित केला.
खासदार वाकचौरेंसाठी मी त्यांची ढाल बनून उभा राहीन; आमदार अमोल खताळांचा थेट इशारा कुणाला ?
तेव्हा तुम्ही कुठे होता, हे विचारणं, त्यांना रुचले नाही-आढळराव पाटील
तेव्हा सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस फारसे लक्ष दिले नाही. 22 जूननंतर उबाठा गटाने गावा-गावा सभा आयोजित केल्या होत्या. कोणीच दखल घेत नव्हते. मला वाईट वाटत होते. सभापती सहा महिने जेलमध्ये होता. तेव्हा तुम्ही कुठे होता, असे मी विचारले. हे त्यांना रूचले नाही, म्हणून त्यांनी माझी हकालपट्टी केली, असे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.
खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा
आपल्या भागातून रेल्वे निघून जाण्यास विद्यमान खासदार जबाबदार आहेत. तसेच गेल्या सात वर्षांमध्ये या भागातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गाबाबत कोणतीही मोठी प्रगती विद्यमान खासदार यांनी पाठपुरावा न केल्यामुळे झाली नसल्याचा आरोप म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.