Video : मोठं मोठी कामे करण्याची क्षमता फक्त वळसे पाटलांमध्येच; आढळरावांची तुफान बॅटिंग
Shivajirao Adhalarao Patil Sabha For Dilip Walse Patil : आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या प्रचारार्थ शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत. मी आपल्या या गटातून साडेचार पाच हजार मतांनी पिछाडीवर होतो.पण यावेळी मला खात्री आहे, की कमीत कमी यावेळी वळसे पाटील दहा हजार मतांनी पुढं असले पाहिजेत. तेवढी आपली जबाबदारी आहे. नाहीतर विरोधकांना मतदान केलं तर डॉ. अमोल कोल्हेंना मतदान गेलं असं समजा, असं आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) म्हणाले आहेत. ते दिलीप वळसे पाटलांच्या प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, अमोल कोल्हेंनी आपल्यासाठी आतापर्यंत काय केलंय? थोडा विचार केला पाहिजे. त्यांनी जुन्नर तालु्क्यातील कोपरमांडवं दत्तक घेतलं होतं. त्यासाठी मी अनेक कामं (Assembly Election 2024) केलीय.गेल्या पाच वर्षांपासून मी त्या गावामध्ये पाण्याचा टॅंकर पुरवत आहे. फेब्रुवारी महिन्यात ते माझ्याकडे आले आणि म्हणाले साहेब आमचं गाव अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलंय. परंतु गावात पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत. मी स्वत:च्या खिशातून खर्च करून दोन टॅंकर तीन महिने चालवले. पण शेवटी काय झालं? असं होवू देवू नका असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीवाले भ्रष्टाचारातील खेळाडू; त्यांना संधी देऊ नका, पंतप्रधानांचा विरोधकांवर घणाघात
आढळराव पाटील भरसभेत बोलताना म्हणाले की, शेवटी विचार करा की, आपल्यासाठी कोण काय करत आहेत? माझ्यापेक्षा सु्प्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी धनगर आरक्षणासाठी किती मोठा आवाज उठवला हे विचारा. यावेळी आढळराव पाटलांनी विरोधकांवर सडकून टीका केलीय. त्याचप्रमाणे उज्वल भविष्यासाठी त्यांनी पुढच्या पिढीसाठी दिलीप वळसे पाटलांना मतदान करा, असं आवाहन केलंय.
साखर कारखाना, दूध संघ अन् पाणी.. तानाजी सावंतांनी भविष्यातील प्रोजेक्टच मांडला
मोठी मोठी कामे करण्याची क्षमता फक्त दिलीप वळसे पाटलांमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. येणारी 20 तारीख तुमच्या आमच्या भविष्याची आहे. तुमच्या आमच्या भविष्याची आहे. पुढच्या पिढीची ही पाच वर्षे आहेत. त्यामुळे 20 तारखेला कोणत्याही भावनेला बळी न पडता फक्त घड्याळ चिन्हाच्या बाजूचं बटण दाबून दिलीप वळसे पाटलांना बहुमताने विजयी करा, असं आवाहन आढळराव पाटील यांनी केलंय.