तरूणाई गुन्हेगारीकडे वळतेय…आम्ही राजकीय लोकं भर घालतोय; दिलीप वळसे पाटलांची कबुली

Dilip Walse Patil On Youth Turning Towards Crime : राज्यात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. तरूणाई गुन्हेगारीकडे (Crime) वळतेय. आम्ही राजकीय लोकं त्यात भर घालतोय, अशी कबुली राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) दिली आहे.
पुणे बीड किंवा आणखी कुठे असेल, कोयत्याने हल्ले व्हायला लागले आहेत. खेड्यापाड्यात शहरात बंदुकीने, पिस्तुलने हल्ले होत आहेत. ही प्रवृत्ती का वाढली? या वाढलेल्या प्रवृत्तीचा संबंध नेमका कशासोबत आहे? माझ्या बुद्धीनुसार, (Dilip Walse Patil News) असलेल्या लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या तरूणांची आहे. या तरूणांच्या हाताला काम नसेल, त्यांच्या जीवनात नोकरी नाही म्हणून त्यांना बायको मिळत नसेल. त्यामुळे त्यांच्यात आलेलं नैराश्य असेल, या आणि याच्यासारख्या अनेक गोष्टींमधून सुद्धा आज समाजातील वातावरण बिघडत आहे.
‘पुरावे असतील, तरच धनंजय मुंडेंवर कारवाई होईल…’ देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
आम्ही राजकीय लोकं यात भर घालतो. आता औरंगाबादला चाललंय, कबर उखडून टाकायची. चारशे वर्षापूर्वी घडलेली घटना, त्याच्यावरून दंगली. मी असंच तुम्हाला उदाहरण सांगतो, नागपूरला दंगल झाली. ज्यावेळी मी गृहमंत्री होतो. त्यावेळी असंच एक व्हॉट्सअपवर आलं की, एका मस्जिदला आग लावलेली आहे. त्या आगीचं व्हॉट्सअपवर सगळीकडे गेलं. मग मालेगावला दंगल झाली, अमरावतीला दंगल झाली. आणखीन बाकीच्या काही ठिकाणी दंगली झाल्या.
वळसे पाटील म्हणाले की, आम्ही नंतर जेव्हा घटनेच्या पूर्ण तपासात गेलो, तेव्हा कळलं की तो व्हिडिओ भारतातील नव्हता, बांग्लादेशमधील होता. दुसऱ्या देशात घडलेल्या घटनेवरून आम्ही चाकू, सुऱ्या काढून आपासापसांत लढायला लागलो, तर फुले, शाहू आंबेडकरांनी सांगितलेला एक सामाजिक विचार आणि वारसा हा सगळ्या जातीपाती आणि धर्म, एकत्र घेवून आपण कसे पुढे जाणार आहोत? यासंदर्भात शाळेत काही शिकवलं जातं की नाही, मला माहीत नाही.
परंतु नवीन आलेल्या टुल्सच्या माध्यमातून एक प्रकारचा आक्रमकपणा तरूण पिढीमध्ये तयार होत आहे. परवा एक बातमी वाचली, सख्ख्या बापानेच आपल्या मुलीवर रेप केला. भावानेच भावाचा खून केला, हे का वाढलं? याला प्रशासन काय करेल, हे वाढत जाणारे प्रकार आहे. यातून समाज विघटिक होत आहे. जातीपातीत अंतर तयार होतंय, त्यावेळी आपल्याला जास्तीत जास्त समस्यांना सामोरं जावं लागतंय, हे होवू नये आम्ही प्रयत्न करत आहोत, असं दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं आहे.