‘आमच्याकडे बोट केलं की, आम्ही दांडूक काढणार!’ प्रताप चिखलीकरांनी अजितदादांसमोरच अशोक चव्हाणांना दम भरला

‘आमच्याकडे बोट केलं की, आम्ही दांडूक काढणार!’ प्रताप चिखलीकरांनी अजितदादांसमोरच अशोक चव्हाणांना दम भरला

Pratap Chikhlikar Warns Ashok Chavan in front of Ajit Pawar : आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांनी (Pratap Chikhlikar) चार माजी आमदारांना सोबत घेवून नांदेडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला मजबूत केलंय. आज नांदेडमध्ये आज देखील मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रताप चिखलीकर यांनी अजितदादा यांच्यासमोरच अशोक चव्हाण यांना (Ashok Chavan) दम भरल्याचं समोर आलंय. आज नरसी येथे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये भास्कर पाटील खतगावकर, मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासोबतच इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी प्रतापराव चिखलीकर म्हणाले की, चांगले चांगले कुटूंब आपल्यापासून दूर गेलोय. मी या भागाचा खासदार म्हणून पाच वर्ष काम केलंय. दादा, नांदेड जिल्ह्याच्या रेल्वेच्या विकासात मागच्या पंचवीस वर्षात कोणत्याही (Maharashtra Politics) खासदाराने काम केलं नाही, ते काम करण्याची संधी मला मिळाली. त्याला मान्यता मिळविण्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यश मिळालं, असं प्रतापराव चिखलीकर यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील अन् अजित पवारांच्या भेटीवरून भुजबळांचा सवाल; म्हणाले, आम्ही शत्रू… काय बिघडलं?

मी आणखी भाजपला हात घातलेला नाही. माझ्या मित्रांना माझी काळजी आहे. एकदा जर त्यांनी चुकून इकडे बोट केलं तर आम्ही दांडूक काढल्याशिवाय राहणार नाही, असा देखील दम प्रताप चिखलीकर यांनी (Nanded News) अशोक चव्हाण यांचं नाव न घेता त्यांना भरलेला आहे. मला फार लवकर अशोक चव्हाण कळले, असा देखील टोला त्यांनी लगावला आहे.

काही लोकांनी म्हटलंय की, आम्ही स्वातंत्र्य निवडणुका लढविणार. मी सांगितलं की आमचे नेते दादा, तटकरे साहेब भाजपचे नेते फडणवीस साहेब आणि शिवसेनेचे नेते शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. परंतु जर कुणात कुणकुणीच असेल स्वातंत्र्य निवडणूक लढविण्याची तर नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी देखील कमी नाही, असा इशारा देखील प्रताप चिखलीकर यांनी दिला आहे.

जयंत पाटील मोठ्या कासाची पण…दूध चोरणारी म्हैस, पडळकरांची खोचक टीका

राष्ट्रवादी कॉंग्रेसची घोडदौड वाढत आहे. दिवसेंदिवस लोकांना वाटतंय की, आपण शब्दाला जागणाऱ्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करावं. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस आपला झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही, असा देखील शब्द प्रताप चिखलीकर यांनी भरसभेमध्ये अजित पवार यांना दिलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube