महिनाभर का गप्प बसलात? तुमचं तोंड शिवलं…; प्रणिती शिंदेंच्या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर
Ram Kadam on Praniti Shinde : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पिलावळींचा सोलापुरात दंगल घडवून आणण्याचा कट होता, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केला होता. त्यावर आता भाजप आमदार राम कदम यांनी सडतोड प्रत्यूत्तर दिलं. तुमच्या आरोपात काही तथ्य असेल तर महिनाभर का गप्प बसलात? असा सवाल कदम यांनी केला.
पराभव माझा, पण नाचक्की भाजप अन् चव्हाणांची, प्रतापराव चिखलीकरांची नाराजी जाहीर…
राम कदम म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची ओळख देव माणूस म्हणून आहे. विरोधी पक्षातील खासदार, आमदार, कार्यकर्ते त्यांना त्याच भूमिकेतून आदराने पाहतात. वेगळा पक्ष असेल तर वेगळी भूमिका मांडावी लागते, हे समजू शकतो. आता प्रणिती शिंदे खासदार झाल्यात, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेच. पण, आज त्यांनी फडणवीसांवर जे आरोप केले, ते आरोप करण्यासाठी तुम्ही महिनाभर कसली वाट पाहत होता. निवडणूक पूर्ण होऊन महिना होत आला, जर तुमच्या आरोपात काही तथ्य असेल तर तुम्ही महिनाभर गप्प का बसलात? कोणी तुमचं तोंड शिवलं होत का? अशी सवाल कदम यांनी केला.
शिखर बॅंक : क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला? अण्णा हजारे म्हणतात, ‘मला कल्पनाच नाही…’
पाकिस्तानचे झेंडे नाचवत निवडून आले
पुढं बोलतांना कदम म्हणाले, आज आपण बोलत आहात, पण, तेव्हाच का नाही बोलला? महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला किती गृहीत धराल? लोकसभेच्या निवडणुकीत असाच खोटा प्रचार केला. संविधान बदलणार, संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून पाकिस्तानचे झेंडे नाचवत हे निवडून आलेत, अशी टीका कदम यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तुमच्या पक्षाची भूमिका म्हणून तुम्ही जरूर आरोप करा. पण अशा प्रकारचे गंभीर आरोप करत असताना महाराष्ट्राची जनता आणि महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असं कदम म्हणाले.
प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?
सोलापुरात दंगल घडवून आणण्याची देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन होता. त्यांना माहित होतं की, निवडणूक त्यांच्या हातून गेली म्हणून ही कट कारस्थाने त्यांनी केली. त्यांची मतदानाच्या पाच दिवस आधीची भाषणे काढून बघा, त्यांच्या हालचाली तशाच होत्या, मतदानाच्या दिवशी पोलीस आयुक्त सतर्क राहिले म्हणून प्रसंग टळले, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या होत्या.