शिखर बॅंक : क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला? अण्णा हजारे म्हणतात, ‘मला कल्पनाच नाही…’

शिखर बॅंक : क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला? अण्णा हजारे म्हणतात, ‘मला कल्पनाच नाही…’

नगर : लोकसभा निवडणुकीपूर्वी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी (Shikhar Bank Scam) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी (Anna Hazare) आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आलं. मात्र, आक्षेप कोणी घेतला हेच आपल्याला माहिती नसल्याचं हजारेंनी म्हटलं.

Raveena Tandon चा ‘तो’ व्हिडिओ बनविणे महागात पडणार; तब्बल शंभर कोटी द्यावे लागणार? 

शिखर बँक प्रकरणातातील अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर हरकत घेण्यात आल्याच्या वृत्तात अण्णा हजारेंचं नाव आलं. संबंधित याचिकेची सुनावणी २९ जून रोजी होणार आहे. मात्र क्लोजर रिपोर्टबाबत आपण कोणतीही हरकत घेत याचिका दाखल केली नसल्याचा मोठा खुलासा स्वतः अण्णांनी केला आहे. १३-१४ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून आपणाला याबाबत सध्या काय सुरू आहे? हे माहीत नसून मला वृत्तपत्रातील बातम्यांतून मी हरकत घेतल्याचे समजले असल्याचे अण्णा हजारेंनी स्पष्ट केलं. आपण अशी कोणतीही हरकत घेत याचिका दाखल केल्याला त्यांनी नकार दिला. माझे नाव या याचिकेत कसे आले? याची माहिती नसल्याचे सांगत हे चुकीचे असल्याचे हजारे यांनी सांगितले.

फडणवीस आणि त्यांची पिलावळ सोलापुरात दंगल घडवणार होते, प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप 

सन २००१ ते २०१३ दरम्यान राज्य शिखर बँकेत दोन हजार कोटींवर कर्ज वाटपात मोठा घोटाळा झाल्याचे पुढे आले होते. या बाबत सरकारच्या विविध संस्था आणि विभागाने ठपका ठेवला होता. या नंतर या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, आनंदराव अडसूळ आदी विविध पक्षांच्या ७६ व्यक्तींवर गुन्हा दाखल करून चौकशी केली होती. मात्र त्यानंतर या चौकशीबाबत आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला.

राज्यातील सरकार बदलत गेले, तसे कधी पुन्हा चौकशी, तर कधी अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पुन्हा याच पद्धतीने क्लोजर रिपोर्ट दाखल झाल्यानंतर पाच जणांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली असून यात माध्यमातून समाजसेवक अण्णा हजारे हे एक याचिकाकर्ते असल्याचे म्हटले गेले आहे. मात्र याबाबत अण्णांशी संपर्क केला असता त्यांनी स्पष्ट शब्दात सध्या दाखल केलेल्या याचिकेबाबत कानावर हात ठेवत याबाबत आपण कसलीही याचिका दाखल केली नसल्याचे सांगितले.

अण्णा आता जागे झाले!!
याबाबत हजारे यांना विरोधी पक्षातले लोकं अण्णा आता कसे जागे झाले? असे प्रश्न उपस्थित करत असल्याबद्दल विचारले त्यांनी हे चुकीचे आरोप असल्याचे सांगत ज्या गोष्टीची मला कल्पनाच नाही, त्याबद्दल कसे बोलणार? अशी त्रोटक प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज