Raveena Tandon चा ‘तो’ व्हिडिओ बनविणे महागात पडणार; तब्बल शंभर कोटी द्यावे लागणार?
Raveena Tandon Accident Video making cost to person she 100 crore defamation claim : नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने चर्चेत असणारी अभिनेत्री रवीना टंडन ( Raveena Tandon ) नुकतीच वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आली होती. शनिवारी (1 जून) रात्री उशिरा मुंबईतील बांद्रा या भागामध्ये रवीनाने एका लहान मुलीसह वृद्ध महिलेच्या अंगावर गाडी घालत त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. मात्र हा व्हिडीओ बनवणाऱ्यांना हे प्रकरण चांगलंच महागात पडणार आहे. कारण रवीनाने हा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीवर तब्बल 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ही घटना घडली त्यावेळी रवीना नशेमध्ये असल्याचे देखील आरोप करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये दिसत होते की, पीडित लोक आणि स्थानिक यांनी रवीनाला घेराव घातला आहे. तसेच पोलिसांना बोलावण्यात आहे. तर यातील एक पीडित महिला म्हणत होती. आजची रात्र तुला जेलमध्ये काढावी लागेल. माझ्या नाकातून रक्त येत आहे. यावेळी रवीनाने व्हिडिओ न काढण्याची विनंती देखील केली. तसेच ती म्हणत होती. मला धक्के देऊ नका मला मारू नका.
फडणवीस आणि त्यांची पिलावळ सोलापुरात दंगल घडवणार होते, प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप
दरम्यान एक व्यक्ती सांगत होता की, या घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेल्या त्याची आई, बहीण आणि भाची हे मुंबईतील रिजवी कॉलेज या ठिकाणहून जात होत्या. त्याचवेळी रवीनाने त्यांच्या अंगावर गाडी घातली. तसेच आपल्या आई बहिणीने विरोध केला असता त्यांना मारहाण देखील करण्यात आली. यावेळी रवीना नशेमध्ये होती. ती गाडीतून बाहेर पडली तिने देखील या वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप या व्यक्तीने केला होता.
त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला त्यामध्ये ती निर्दोष असल्याचं समोर आलं आहे. मात्र आपली अशा प्रकारे बदनामी केल्याने रवीनाने हा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीवर तब्बल 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसेच आपल्याला पाठिंबा दिल्याने तिने आपल्या चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.