Raveena Tandon कडून कार अंगावर घालत वृद्ध महिलेला मारहाण; अभिनेत्री नशेत असल्याचा आरोप

Raveena Tandon कडून कार अंगावर घालत वृद्ध महिलेला मारहाण; अभिनेत्री नशेत असल्याचा आरोप

Raveena Tandon beating old women accused being drunk on actress : नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने चर्चेत असणारी अभिनेत्री रवीना टंडन ( Raveena Tandon ) यावेळी मात्र वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. शनिवारी रात्री उशिरा मुंबईतील बांद्रा या भागामध्ये रवीनाने एका लहान मुलीसह वृद्ध महिलेच्या अंगावर गाडी घालत त्यांना मारहाण केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येत आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून रवीनावर प्रचंड टीका केली जात आहे.

एक्झिट पोल म्हणजे “जो देईल पेजेला त्याच्या शेजेला”; इंडिया आघाडी जिंकणार, राऊतांचा दावा

तसेच ही घटना घडली त्यावेळी रवीना नशेमध्ये असल्याचे देखील आरोप करण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पीडित लोक आणि स्थानिक यांनी रवीनाला घेराव घातला आहे. तसेच पोलिसांना बोलावण्यातच आहे. तर यातील एक पीडित महिला म्हणत आहे. आजची रात्र तुला जेलमध्ये काढावी लागेल. माझ्या नाकातून रक्त येत आहे. यावेळी रवीनाने व्हिडिओ न काढण्याची विनंती देखील केली. तसेच ती म्हणत आहे. मला धक्के देऊ नका मला मारू नका.

दरम्यान एक व्यक्ती सांगत आहे की, या घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेल्या त्याची आई, बहीण आणि भाची हे मुंबईतील रिजवी कॉलेज या ठिकाणहून जात होत्या. त्याचवेळी रवीनाने त्यांच्या अंगावर गाडी घातली. तसेच आपल्या आई बहिणीने विरोध केला असता त्यांना मारहाण देखील करण्यात आली. यावेळी रवीना नशेमध्ये होती. ती गाडीतून बाहेर पडली तिने देखील या वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे.

पहिल्याच साामन्यात चौकार, षटकारांचा थरार; यजमान अमेरिकेचा कॅनडाला धक्का

त्यामुळे एकीकडे पुण्यातील अल्पवयीन मुलाच्या पोर्श कार अपघाताचं प्रकरण ताज असतानाच आता अभिनेत्री रवीना टंडनवर देखील शनिवारी रात्री उशिरा मुंबईतील बांद्रा या भागामध्ये रवीनाने एका लहान मुलीसह वृद्ध महिलेच्या अंगावर गाडी घालत त्यांना मारहाण केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज