एक्झिट पोल म्हणजे “जो देईल पेजेला त्याच्या शेजेला”; इंडिया आघाडी जिंकणार, राऊतांचा दावा

एक्झिट पोल म्हणजे “जो देईल पेजेला त्याच्या शेजेला”; इंडिया आघाडी जिंकणार, राऊतांचा दावा

Sanjay Raut press conference : अतिशय फ्रॉड हे एक्झिट पोल आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये हे एक्झिटपोल खोटे ठरत आहेत.  मात्र, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे ध्यान केलं. (Lok sabha Election) ते पाहता त्यांना किमान 800 लोकसभेच्या जागा मिळायला हव्यात असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. तसंच, त्यांना 800 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तरच हे ध्यान मार्गी लागंल अस मी म्हणेल असंही ते म्हणाले आहेत. (Sanjay Raut)  ते माध्यमांशी बोलत होते.

इंडिया आघाडी 315  जागा जिंकणार    सहा राज्यात काँग्रेसचा भोपळा एक्झिट पोलने वाढली इंडिया आघाडीची धाकधूक

पैसा फेको तमाशा देखो असा हा एक्झिट पोलचा खेळ आहे. आमचा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. जर तुम्हाला विजयाची खात्री असेल तर धमक्या कशाला देता. परंतु, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असे हे पोल आहेत. जो देईल पेजेला त्याच्या शेजेला अशा या एक्झिट पोल संस्था आहेत. कारण मोठा पैसा वाटून पोल घडवून आणतात असा थेट आरोप राऊतांनी केला. त्याबरोबर देशात इंडिया आघाडी 295 ते 315 आणि महाराष्ट्रात 30 ते 35 जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमचा जनतेतील सर्वे

त्याचबरोबर सुप्रिया सुळे बारामतीतून हरतील असं म्हणत होते. मात्र, लक्षात ठेवा सुप्रिया सुळे किमान दीड लाखाने निवडणून येतील. शिवसेना उद्धव ठाकरे गट 18 जागा कायम राखेल तर काँग्रेसलाही मोठं यश मिळेल असंही संजय राऊत यावेळी म्हणाले. तसंच, महाविकास आघाडीच्या थोड्याफार नाही तर सर्वात जास्त जागा निवडून येथील असंही ते म्हणाले. कारण आम्हीही राजकारण समजतो. आम्ही जे आकडे सांगोय तो जनतेतील सर्वे आहे असंही ते म्हणाले आहेत.

इंडिया आघाडीचं सरकार येणार  Exit Poll : मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान, केरळ, तामिळनाडूत खातं उघडणार

उत्त प्रदेश इंडिया आघाडी 40 च्या पुढे असेल, बिहारमध्ये आरजेडी 16 जागांच्या पुढे असेल तसंच तामिळनाडू राज्यात भाजपला एकही जागा मिळणार नाही. तेथे एकतर्फी इंडिया आघाडीचा विजय होईल. तसंच, कर्नाटकमध्ये काँग्रेस मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडी लवकरच सरकार स्थापनेची तयारी करणार आहे असा दावाही राऊतांनी यावेळी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज