पहिल्याच सामन्यात चौकार, षटकारांचा थरार; यजमान अमेरिकेचा कॅनडाला धक्का
USA vs Canada T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषकाचा पहिलाच सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा संघात झाला. या सामन्यात चौकार आणि षटकारांचा थरार पाहण्यास मिळाला. या सामन्यात अमेरिकेने सात गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला. अँड्र्यूज गॉस आणि अॅरॉन जोन्स या जोडीने तुफान फलंदाजी करत कॅनडाच्या गोलंदाजांना हैराण केले. प्रथम फलंदाजी करताना कॅनडाच्या संघाने 20 ओव्हर्समध्ये 194 धावा केल्या. नवनीत धालीवाल आणि निकोलस कर्टन यांनी अर्धशतके केली. पाच विकेट्सच्या मोबदल्यात कॅनडाने मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र अमेरिकेच्या फलंदाजांनी धडाकेबाज खेळ करत एकतर्फी विजय मिळवला.
T20 World Cup : आयसीसीने केली सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ‘या’ संघाला देणार टक्कर
या सामन्यात अॅरॉन जोन्स आणि अँड्रीज गॉस संघासाठी हिरो ठरले. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर अमेरिकेने पहिल्याच सामन्यात टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिलाच सामना जिंकला. नाणेफेक जिंकून अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅनडाने 195 धावांचे टार्गेट दिले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अमेरिकेच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी केली. अॅरॉन जोन्स आणि अँड्रीज गॉस यांनी दमदार फलंदाजी केली. या दोघांच्या खेळीमुळे सामना एकतर्फी झाला.
A historic win for USA in the #T20WorldCup 2024 opener 🇺🇸😍
How it happened ➡️ https://t.co/MDKcwvzOPn pic.twitter.com/ReiAnZTy7B
— ICC (@ICC) June 2, 2024
या सामन्यात अमेरिकेची सुरुवात खराब राहिली. स्टीव्हन टेलर खाते न उघडताच बाद झाला. यानंतर कर्णधार मोनांक पटेल सुद्धा फक्त 16 धावा करून बाद झाला. यानंतर अॅरोन जोन्स आणि अँड्रीज गॉस यांनी मोठी भागीदारी करत संघाच्या डावाला सावरले. या दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. गॉसने 65 रन केले. कॅनडाच्या निखील दत्ताने त्याला बाद करत भागीदारी तोडली. दुसऱ्या बाजूला अॅरॉन खेळपट्टीवर होता. त्याने 40 चेंडूत 94 धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये चार चौकार आणि दहा षटकारांचा समावेश आहे. या सामन्यातील फलंदाजीच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
या सामन्यात कॅनडाचा एकही गोलंंदाज चालला नाही. त्याचा फटका कॅनडाला बसला. पहिल्याच सामन्यात नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. 194 चांगली धावसंख्या उभारलेली असतानाही या धावांचा बचाव गोलंदाजांना करता आला नाही. पहिल्याच सामन्यात विजय मिळाल्याने यजमान अमेरिका संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.
T20 World Cup 2024 सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का, ICC ची ‘ही’ चूक पडू शकते महागात