फडणवीस आणि त्यांची पिलावळ सोलापुरात दंगल घडवणार होते, प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

फडणवीस आणि त्यांची पिलावळ सोलापुरात दंगल घडवणार होते, प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Praniti Shinde on Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पिलावळींचा सोलापुरात दंगल घडवून आणण्याचा कट होता, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केला आहे.

महायुतीत वाद पेटला! शिरसाटांच्या मोठ्या भावाच्या वक्तव्यावर राणेंनी सुनावलं, म्हणाले, ‘कुणी तराजू घेऊन…’ 

लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुतेंचा पराभव केला. त्यानंतर आज सोलापूरात काँग्रेसच्या वतीने कृतज्ञता सोहळा पार पडला. प्रणिती शिंदेंच्या विजयाबद्दल या कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना प्रणिती शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ सोलापुरात दंगल घडवणार होते. पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने भाजपचे षडयंत्र फसले, अशी टीका शिंदेंनी केली.

मोठी बातमी : माझा शेवटचा T20 विश्वचषक; संघाच्या खराब कामगिरीनंतर ट्रेंट बोल्टचा ‘रामराम’ 

पुढं बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापुरात दंगल घडवून आणण्याची देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन होता. त्यांना माहित होतं की, निवडणूक त्यांच्या हातून गेली म्हणून ही कट कारस्थाने त्यांनी केली. त्यांची मतदानाच्या पाच दिवस आधीची भाषणे काढून बघा, त्यांच्या हालचाली तशाच होत्या, मतदानाच्या दिवशी पोलीस आयुक्त सतर्क राहिले म्हणून प्रसंग टळले, अशी तोफ डागत प्रणिती यांनी फडणवीसांवर टीका केली. भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे, रक्ताने राजकारण करतात ही लोकं, असंही प्रणिती म्हणाल्या.

संविधान संपवण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेने चपराक लगावली. भाजप आणि दहशतवाद्यांमध्ये काय फरक आहे? हे देशात राहून भांडणं लावत आहेत. भाजपने किती पैसे वाटले? एक साडी आणि ५०० रुपये देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. पैसे दिले तरीही तुम्ही त्यांना मतदान केले नाही, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज