महायुतीत वाद पेटला! शिरसाटांच्या मोठ्या भावाच्या वक्तव्यावर राणेंनी सुनावलं, म्हणाले, ‘कुणी तराजू घेऊन…’
Sanjay Shirsat : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच आता महायुतीतील शिंदे गटाचे नेते आमदार नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आम्हीच महायुतीत मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य केलं. शिरसाट यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे वक्तव्य केल्याने महायुतीत (Mahayuti) जुंपण्याची चिन्हे आहेत.
मोठी बातमी : माझा शेवटचा T20 विश्वचषक; संघाच्या खराब कामगिरीनंतर ट्रेंट बोल्टचा ‘रामराम’
संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यामुळे आम्हीच महायुतीत मोठे भाऊ आहोत. ठाकरे यांनी 22 जागांवर निवडणूक लढवली होती. आम्ही लढवलेल्या जागा या 15 होत्या. त्यामुळे आमचा स्ट्राइक रेट चांगला असल्याचं शिरसाट म्हणाले. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असंही शिरसाट यावेळी म्हणाले.
टी. राजाला येऊच का देता? महाराष्ट्र अशांत करून राजकीय लाभ उठण्याचे प्लॅनिंग…; आव्हाडांचे टीकास्त्र
यावेळी बोलतांना त्यांनी ठाकरे गटावरही टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसची ताकद आणि निवडणू आलेले खासदार या बेसवर त्यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, असं नाना पटोलेंनी सांगितलं. ज्यांनी त्यांची पालखी वाहिली होती, त्यांच्या पालखीचे जे खांदेकरी होते. त्यांनी पालखी घेऊन पुढे न्यावी. 288 मतदारसंघ ते लढवतील, त्यांचा विजय होवो अथवा पराभव होवो, हे लोक पालखीचे भोईच आहेत, असा टोला शिरसाट यांनी ठाकरे गटाला लगावला.
ते म्हणाले, तुम्ही काय कमावलं आणि गमावलं? यावर चिंतन केलं नाही तर भविष्यात तुम्ही पालखी वाहण्यापासून राहणार नाही. संजय राऊत म्हणेल, तसा पक्ष चालतं असेल तर पक्षाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.
मराठ्यांना न्याय देण्याचं काम सरकार करतेय
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होतं, तिथं मंत्री शंभूराज देसाई तेथे गेले होते. न्याय देण्याचं काम सरकार करत आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. ओबीसी आरक्षणाला धोका न लावता हे काम केले जात असल्याचं शिरसाट म्हणाले.
जबाबदारीने बोला – राणे
दरम्यान, आम्हीच मोठा भाऊ आहोत, या शिरसाट यांच्या वक्तव्यावर आता खासदार नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शिरसाट यांनी केलेल्या मोठा भाऊ या महायुती असल्याने प्रत्येकाने जबाबदारीने बोलले पाहिजे. येथे लहान-मोठ्याचा प्रश्न नाही. कुणी तराजू घेऊन बसलेले नाही. लहान कोण, मोठं आणि मध्यम कोण ठरवायला, असं राणे म्हणाले