टी. राजाला येऊच का देता? महाराष्ट्र अशांत करून राजकीय लाभ उठण्याचे प्लॅनिंग…; आव्हाडांचे टीकास्त्र

टी. राजाला येऊच का देता? महाराष्ट्र अशांत करून राजकीय लाभ उठण्याचे प्लॅनिंग…; आव्हाडांचे टीकास्त्र

Jitendra Awhad : भिवंडी तालुक्यातील पडघा टोलनाका परिसरात आज सायंकाळी सकल हिंदू समाजाच्यावतीने भव्य संत संमेलन आणि हिंदु धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत तेलंगना येथील आमदार टी राजा सिं (MLA T Raja Singh) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावरूच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हा (Jitendra Awhad) यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

महायुतीतून अजितदादांचं ‘घड्याळ’ वगळलं तरीही मजबुती कायम; वाचा कशी आहे ‘आकडेमोड’! 

महाराष्ट्र अशांत करून राजकीय फायदा उठवण्याचे सरकारचे प्लॅनिंग आहे का? तसं नसेल तर टी. राजाला महाराष्ट्रात येण्याची परवानगीच का देता ? असा रोखठोक सवाल आव्हाड यांनी केला आहे.

यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट ट्विटवर केली. त्या पोस्टच्या माध्यमातून टी.राजा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला त्यांनी विरोध केला. आव्हाड यांनी लिहिलं की, ज्याने मागच्या वर्षभर आपल्या भाषणांमधून संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून टाकले होते. तो टी राजा लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्यासाठी भिवंडी शहराजवळील पडघा येथे येतोय. महाराष्ट्र सरकारला अनेकदा सांगितले गेलेय की, त्याची भाषणे द्वेषाने भरलेली, अतिशय घाणेरडी असतात. त्याच्यामुळे धर्मद्वेष पसरण्याची शक्यता असते. शांत असलेल्या महाराष्ट्राला अशांत करण्याचा विचार केला जातोय का? महाराष्ट्र अशांत करून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचे या सरकारचे प्लॅनिंग आहे का? जर तसं नसेल तर टी. राजाला महाराष्ट्रात येऊनच का देता?, असा सवाल आव्हाड यांनी केला.

दक्षिणेत खाते उघडल्याने भाजपकडून थेट केंद्रीय मंत्रिपद, पण खासदाराने इंदिरा गांधींचे गोडवे गायले ! 

त्यांनी पुढे लिहिले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ज्याच्या भाषणाने द्वेष पसरतो; अशा व्यक्तीला तात्काळ अटक करा असे सांगितले आहे, तरीही ठिकठिकाणी इतर धर्मियांवर टीका करून, शाब्दिक हल्ले करून वातावरण बिघडवण्याचे काम टी राजा केले आहे. महाराष्ट्र सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला महाराष्ट्र सरकार केराची टोपली दाखवत आहे का? याची सगळी उत्तरं महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेला हवी आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज