दक्षिणेत खाते उघडल्याने भाजपकडून थेट केंद्रीय मंत्रिपद, पण खासदाराने इंदिरा गांधींचे गोडवे गायले !

  • Written By: Published:
दक्षिणेत खाते उघडल्याने भाजपकडून थेट केंद्रीय मंत्रिपद, पण खासदाराने इंदिरा गांधींचे गोडवे गायले !

BJP MP Suresh Gopi said that Indira Gandhi is mother of India: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले असून, खातेवाटप झाले आहे. मंत्रीही कामाला लागले आहे. या निवडणुकीत दक्षिणेतील केरळ राज्यात भाजपने (BJP) खाते उघडले आहे. त्यामुळे भाजपने येथून खासदार सुरेश गोपी (Suresh Gopi) यांना राज्यमंत्री केले आहे. त्यांना पर्यटन आणि पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. परंतु आता केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी एक विधान करून नवीन राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे.

NEET चिटिंग स्कॅंडल गुजरातमधून! शाळेचे मुख्याध्यापक, इज्युकेशन फर्मचा चालकच मास्टरमाईंड

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या भारत माता (मदर ऑफ इंडिया) आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते करुणाकरण आणि मार्क्सवादी नेते ई. के. नयनार हे राजकीय गुरू असल्याचे मंत्री सुरेश गोपी यांनी म्हटले आहे. मंत्री सुरेश गोपी यांनी पुन्कुन्नम येथे राजकीय गुरु करुणाकरण यांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी गेले होते. हा राजकीय दौरा नसून, मी माझ्या गुरुला नमन करायला आलेलो असल्याचे गोपी यांनी म्हटले आहे. करुणाकरण आणि ई. के. नयनार यांच्यापासून मी खूप प्रभावीत असल्याचे गोपी यांनी म्हटले आहे.

भारताला धोक्याची घंटा! देशात प्रति व्यक्ती ‘इतकीच’ झाडे; पाकिस्तान, दुबईतही जमीन उजाड


सुरेश गोपी हे भाजपचे केरळमधून पहिले खासदार

सुरेश गोपी हे केरळमधून निवडून आलेले भाजपचे पहिले खासदार आहे. केरळ हे राज्य काँग्रेस आणि डाव्यांचा गड आहे. येथे कधीच भाजपचा खासदार निवडून आलेला नाही. यावेळी सुरेश गोपी यांनी इतिहास रचला आहे. त्यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार सुनील कुमार यांचा 75 हजार मतांनी पराभव करत विजय मिळविला आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे. दक्षिणेतील केरळ आणि तामीळनाडू राज्यात भाजपला म्हणावे तसे यश मिळत नाही. परंतु केरळमध्ये खाते उघडल्याने भाजपचे नेते खूश होते. त्यामुळे सुरेश गोपी यांना केंद्रीय मंत्री करण्यात आले. परंतु आता सुरेश गोपी यांनी केलेल्या विधानामुळे वेगळाच राजकीय घडामोडी घण्याची शक्यता आहे.


कोण आहेत सुरेश गोपी?

सुरेश गोपी हे मूळचे केरळमधील अलप्पुझाचे रहिवासी आहेत. 1958 च्या त्यांचा जन्म आहे. कोल्लम येथून ते सायन्समध्ये पदवीधर झाले. तर इंग्रजीमधून पदवीत्तर शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून कारकीर्दाला सुरुवात केली आहे. अनेक दक्षिणात्य चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube