NEET चिटिंग स्कॅंडल गुजरातमधून! शाळेचे मुख्याध्यापक, इज्युकेशन फर्मचा चालकच मास्टरमाईंड

NEET चिटिंग स्कॅंडल गुजरातमधून! शाळेचे मुख्याध्यापक, इज्युकेशन फर्मचा चालकच मास्टरमाईंड

Neet Exam 2024: नीट परीक्षेचा (NEET)वाद संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. त्याविरोधात अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या परीक्षेवरुन विद्यार्थी संतापले आहेत. त्यातच आता गुजरातमधून नीट परीक्षेत घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये परीक्षा सेंटर असणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकासह (Headmaster)एज्युकेशन फर्मचा चालकच मास्टरमाईंड असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

गुजरातमधील (Gujrat)पंचमहाल जिल्ह्याच्या गोध्रा (Godhra Centre) येथील एका शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकासह पाच जणांना (Five Arrested)अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 10 लाख रुपयांची लाच घेऊन 27 परीक्षार्थींना NEET-UG परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्याावर 9 मे रोजी एफआयआर (FIR)नोंदवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवण्याच्या सूचना शिक्षकांनी दिल्या होत्या, जेणेकरून पेमेंटनुसार उत्तरं भरता येतील.

CCI Recruitment : कॉटन कॉर्पोरेशनमध्ये 214 रिक्त पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट युजी परीक्षेबाबत सध्या देशात वाद सुरू आहे. यामध्ये पेपरफुटीचा आरोप विद्यार्थी करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुजरातमधून या लोकांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये शाळेतील शिक्षक तुषार भट्ट, शिक्षण सल्लागार कंपनी रॉय ओव्हरसीजचे परशुराम रॉय आणि शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम शर्मा यांचा समावेश आहे.

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

याबद्दल गोध्रा शहराचे पोलीस अधीक्षक हिमांशू सोलंकी यांनी सांगितले की, पंचमहालच्या जिल्हाधिकाऱ्यांना हा घोटाळा झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ते म्हणाले की, ‘माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि शिक्षक भट्ट यांचा फोन तपासल्यानंतर त्यांना 30 विद्यार्थ्यांची यादी सापडली. अधिकाऱ्यांनी त्याच्या कारमधून 7 लाख रुपये रोख देखील जप्त केले आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकाच्या अटकेनंतर पोलिसांनी शिक्षण सल्लागार कंपनी रॉय ओव्हरसीजच्या परशुराम रॉयला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आठ कोरे चेक आणि आणखी 2.30 कोटी रुपयांचा चेक जप्त केला आहे. यावर एसपी म्हणाले की, अनेक चेकवर पालकांनी सह्या केलेल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, परशुराम रॉय यांनी NEET इच्छुकांची ओळख तुषार भट्ट यांच्याशी करून दिली. तो शाळेत भौतिकशास्त्राचा शिक्षक होता आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA ने नियुक्त केलेल्या परीक्षेसाठी उपअधीक्षक होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या 27 विद्यार्थ्यांनी आधी पैसे भरले होते किंवा रॉय आणि इतरांना पैसे देण्याचे मान्य केले होते, त्यापैकी फक्त तीन उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. एफआयआरनुसार, परीक्षेच्या दिवशी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी शाळेत पोहोचले आणि त्यांनी भट्ट यांची चौकशी केली. संशयास्पद वाटल्यावर, त्यांनी त्यांचा मोबाईल फोन तपासला आणि त्यांना त्यात रॉयने व्हॉट्सॲपवर पाठवलेली 16 उमेदवारांची नावं, रोल नंबर आणि परीक्षा केंद्रांची यादी सापडली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज