पोटात लाथा मारल्या, माझी मासिक पाळी सुरू होती; मालिवाल यांचा FIR’मध्ये दावा
Swati Maliwal Assault Case : दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि आप’च्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल (Swati Maliwal) यांचं मारहाण प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. यामध्ये मालिवाल यांनी तक्रार केली असून त्यामधील वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. आता त्यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये धक्कादायक दावा समोर आला आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा Swati Maliwal यांच्यासोबतच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल
कानाखाली लगावली
स्वाती मालिवाल यांच्या कथित हल्ल्याच्या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या गैरवर्तन प्रकरणाबाबत एआयआरमध्ये धक्कादायक तपशील समोर आला आहे. एफआयआरनुसार मालीवाल यांनी आरोप केला आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहाय्यक विभव कुमारने त्यांना सात ते आठवेळा माझ्या कानाखाली लगावली. तसंच, माझी मासिक पाळी सुरू होती, पोटात लाथा मारल्या असा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला आहे.
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण! खासदार संजय सिंह यांच्याकडून घटनेचा निषेध
मासिक पाळी सुरू होती
स्वाती मालिवाल एफआयआरमध्ये म्हणाल्या, मी ड्रॉईंग रूममध्ये बसले होते. तेव्हा विभव कुमार आत आला आणि माझ्यावर ओरडू लागला. मला शिवीगाळ करू लागला. तुम्ही आमचे कसे ऐकू शकत नाही? तुम्हाला काय वाटते, तुच्छ बाई असे शब्द वापरत मला मारहाण केली असा दावा मालिवाल यांनी केला. माझी मासिक पाळी सुरू असताना मला मोठ्या वेदना झाल्या असं दु:खही त्यांनी व्यक्त केलं.