‘आप’सह युट्यूबर ध्रुव राठीवर मालिवाल यांचा गंभीर आरोप; म्हणाल्या, बलात्काराच्या अन् जीव मारण्याच्या
Swati Maliwal : आम आदी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल गेली काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सहायकाने बिभव कुमार याने आपल्याला मारहाण केली असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर ‘आप’ पक्ष आणि स्वाती मालिवाल यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. हे सुरू असतानाच प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीवर मालिवाल यांनी गंभीर आरोप केले आहेत.
पोटात लाथा मारल्या, माझी मासिक पाळी सुरू होती; मालिवाल यांचा FIR’मध्ये दावा
धमक्यांमध्ये वाढ
ध्रुव राठीने एकतर्फी व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे आपल्याला येणाऱ्या धमक्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे असं मालिवाल म्हणाल्या आहेत. मालिवाल यांनी एक्सवर (ट्विटरव) पोस्ट करत या गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्ये त्या म्हणाल्या आहेत की, “माझ्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझे चारित्र्यहनन करण्याची मोहीम उघडली आहे. त्यानंतर आता माझ्याबद्दल अश्लील कमेंट करणे, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सुरू झाले आहेत. तसंच युट्यूबर ध्रुव राठीच्या एकांगी व्हिडीओनंतर या प्रकारात आणखी वाढ झाली आहे” असा थेट आरोपही त्यांनी केला आहे.
कॉल घेतला नाही
मला मारहाण झाली त्या प्रकरणातील तक्रार मी मागे घ्यावी यासाठी माझा पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. त्यासाठी मला धमकावण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे असा खळबळजनत दावाही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर ध्रुव राठीला माझी बाजू समजावून सांगण्यासाठी मी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने माझ्या कॉल आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष केलं असंही त्या म्हणाल्या आहेत.
केजरीवाल, तुम्ही महिलांचा आदर करायला शिका मालिवाल यांच्या कथित आरोपानंतर भाजप आक्रमक
राठीने काय म्हटल व्हिडिओत?
स्वाती मालिवाल यांनी सांगितल्याप्रमाणे ध्रुव राठीने 22 मे रोजी एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला आहे. ध्रुव राठीला युट्यूबवर दोन कोटी लोक फॉलो करतात. तर एक्स या साईटवर त्याचे २.२ कोटी फॉलोअर्स आहेत. स्वाती मालिवाल यांच्या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय घडलं? याचा व्हिडीओ ध्रुव राठीने प्रसारीत केला आहे. ध्रुव राठीने त्याच्या व्हिडीओमध्ये स्वाती मालिवाल यांच्याबरोबर काय झालं असावं? याची चर्चा केली आहे. यासाठी त्याने सीसीटीव्ही व्हिडीओ आणि माध्यमात आलेल्या बातम्यांचा आधार घेतला आहे. तसंच भाजपाप्रणीत व्यवस्थेने स्वाती मालिवाल प्रकरणात जो वेग दाखवला तो वेग ब्रिजभूषण सिंह आणि प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणात का दाखवला नाही? असा प्रश्नही राठीने उपस्थित केला आहे.