हे आरोप पूर्ण सत्य नाहीत; स्वाती मालिवाल यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं वक्तव्य

हे आरोप पूर्ण सत्य नाहीत; स्वाती मालिवाल यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं वक्तव्य

नवी दिल्ली: दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांचे पूर्व पती नवीन जयहिंद (Navin Jayhind) यांनी स्वाती मालीवाल यांची नार्को चाचणी (Narco test) करण्याची मागणी केली आहे. नवीन जयहिंद यांनी स्वाती मालीवाल यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओत जयहिंद म्हणाले की, स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या मानसिक आरोग्य तपासणी करून घ्यावी. मॅडम, देव भूतांशी लढेल आणि तुम्हाला शिक्षाही देईल… तुम्ही लांडग्यांशी लढा. तुमचे म्हणणं जरी खरं असलं तती ते पूर्णपणे खरे नसेल! शोषण आणि लैंगिकता यात फरक आहे. तुम्ही तुमची नार्को टेस्ट करा आणि ती सार्वजनिक करा, जेणेकरून वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला गालबोट लागणार नाही.

स्वाती मालीवाल यांनी शनिवारी आरोप केला होता की, लहानपणीच त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते आणि यामुळेच त्यांना महिलांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली होती. दिल्ली महिला आयोगाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिन पुरस्कार सोहळ्यानंतर मालीवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी वडिलांवर आरोप केले होते. त्यांनी सांगितलं होत की, चौथ्या वर्गात असतांनाच त्यांना अत्याचाराचा सामना करावा लागला. माझ्या वडिलांनीच माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी मी खूप लहान होतो. माझे वडील मला मारायचे आणि मी स्वतःला वाचवण्यासाठी पलंगाखाली लपायचे.

त्या म्हणाल्या, वडिलांच्या भीतीने मी तासनतास पलंगाखाली लपून मी विचार करायचे की, महिला आणि मुलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांना मी धडा कसा शिकवू आणि महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मी कशी मदत करू शकेन.

आपल्यावरील आपबिती सांगताना मालीवाल म्हणाल्या होत्या की, त्यांचे वडील त्यांना वेणी धरून मारहाण करायचे, त्यामुळे बऱ्याजदा रक्तही वाहू लागलायचं. मी चौथीत असताना माझ्यासोबद हे घडलयं. मालवीय यांनी वडिलांवर आरोप केल्यांनंतर त्या सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या. त्यानंतर एका माध्यमसंस्थेशी बोलतांना त्यांनी सांगिलत होत की, लहानपणीचे कटू अनुभव सांगितल्यावर मला ट्रोल केलं जाईल, हे मला माहित होतं. मात्र, महिलांच्या हक्कांसाठी लढणारी महिल म्हणून माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणं हे मी माझे कर्तव्य समज होते. माझे वडील हे मद्यपी होते. दारूच्या नशेत त्यांनी मला अनेकदा त्रास दिला. मला अमानुष मारहाण केली.

दरम्यान, माझी आई देखील माझ्या वडिलांच्या हिंसाचाराला आणि अत्याचाराची बळी पडली आहे. मात्र, तिने तिचं संरक्षण करण्यासाठी पुरेपर प्रयत्न केले होते.

ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देत भारतीय हॉकी संघाची विजयी खेळी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube