केंद्र-राज्यातील तब्बल 47% मंत्र्यांवर गुन्हे, संपत्ती 30 हजार कोटींपेक्षा जास्त ; ADR चा धक्कादायक अहवाल

केंद्र-राज्यातील तब्बल 47% मंत्र्यांवर गुन्हे, संपत्ती 30 हजार कोटींपेक्षा जास्त ; ADR चा धक्कादायक अहवाल

ADR Reports 47 Percent Ministers Have Criminal Records : असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार देशातील 643 मंत्र्यांपैकी तब्बल 302 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच जवळपास 47 टक्के मंत्री हे लहान-मोठ्या गुन्ह्यांना सामोरे जात आहेत. यापैकी 174 मंत्र्यांवर खून, अपहरण आणि महिलांविरुद्ध गुन्हे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे आरोप आहेत. विशेष म्हणजे, तेलुगू देशम पार्टीच्या मंत्र्यांवर सर्वाधिक आपराधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

केंद्राच्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर अहवाल

ADR चा हा अहवाल केंद्र सरकारने मांडलेल्या त्या विधेयकानंतर प्रसिद्ध झाला (Minister) आहे. ज्यात म्हटले आहे की, जर एखाद्या मंत्री, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांच्यावर पाच वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा होऊ शकेल, असा गंभीर गुन्हा नोंदवलेला (Criminal Records) असेल. त्यांना सलग 30 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवले गेले असेल, तर अशा मंत्र्यांना तत्काळ पदावरून हटवले (Political Leaders) पाहिजे.

कोणत्या पक्षातील किती मंत्री गुन्हेगार?

भाजप : 336 मंत्र्यांपैकी 136 (40%) मंत्र्यांवर गुन्हे नोंद; यापैकी 88 गंभीर गुन्ह्यांना सामोरे.
काँग्रेस : 45 मंत्र्यांवर गुन्हे; त्यात 18 गंभीर आरोपांना सामोरे.
तृणमूल काँग्रेस : 40 मंत्र्यांपैकी 13 वर प्रकरणे; त्यात 8 गंभीर स्वरूपाची.
डीएमके : 31 मंत्र्यांपैकी तब्बल 27 वर गुन्हे; त्यात 14 गंभीर.
आम आदमी पार्टी : 16 पैकी 11 मंत्री गुन्ह्यांना सामोरे; त्यात 5 गंभीर आरोप.
तेलुगू देशम पार्टी : 23 मंत्र्यांपैकी 22 वर गुन्हे; 13 जण गंभीर प्रकरणांना सामोरे.
राष्ट्रीय स्तरावर पाहता, केंद्रातील 72 मंत्र्यांपैकी 29 मंत्र्यांनी स्वतःवर गुन्हे नोंद असल्याची नोंद केली आहे.

कोणत्या राज्याची स्वच्छ प्रतिमा?

आंध्र प्रदेश, तमिळनाडू, बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि पुडुचेरी येथे 60 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. उलट हरियाणा, जम्मू-काश्मीर, नागालंड आणि उत्तराखंड या राज्यांतील मंत्र्यांवर एकही गुन्हा नोंदलेला नाही.

मंत्र्यांची संपत्ती

ADR च्या अहवालानुसार, मंत्र्यांची सरासरी संपत्ती 37.21 कोटी रुपये आहे. सर्व 643 मंत्र्यांची एकूण संपत्ती जवळपास 30 हजार कोटी रुपये आहे. कर्नाटकातील सर्वाधिक मंत्री अब्जाधीश असून, केंद्रातील 72 मंत्र्यांपैकी 6 जण अब्जाधीश आहेत.

सर्वाधिक अब्जाधीश मंत्री भाजपमध्ये (14 मंत्री).
काँग्रेसमध्ये 61 मंत्र्यांपैकी 11 अब्जाधीश आहेत.

सर्वात श्रीमंत अन् गरीब मंत्री

सर्वात श्रीमंत मंत्री : तेलुगू देशम पार्टीचे आंध्र प्रदेशातील गुंटूरचे खासदार डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी — 5 हजार कोटींपेक्षा अधिक संपत्ती.
दुसऱ्या क्रमांकावर : कर्नाटक काँग्रेसचे डी. के. शिवकुमार — 1400 कोटींची संपत्ती.
सर्वात गरीब मंत्री : त्रिपुरातील इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा पक्षाचे शुक्ला चरण नोतिया — फक्त 2 लाख रुपयांची संपत्ती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube